घरताज्या घडामोडीउल्हासनगरमध्ये कोरोनाची भिती संपली; विना मास्क राजकीय मंडळी आणि नागरिकांचा रस्त्यावर वावर

उल्हासनगरमध्ये कोरोनाची भिती संपली; विना मास्क राजकीय मंडळी आणि नागरिकांचा रस्त्यावर वावर

Subscribe

उल्हासनगर शहरात इतर शहरांपेक्षा कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असल्यामुळे नागरिकांमधली कोरोनाची भीती संपल्यात जमा आहे. यामुळे शहरात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

उल्हासनगर शहरात इतर शहरांपेक्षा कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असल्यामुळे नागरिकांमधली कोरोनाची भीती संपल्यात जमा आहे. यामुळे शहरात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे वाढते प्रमाण कोरोनाला आमंत्रण असतानाच दक्षता कमिटीकडून विना मास्क फिरणाऱ्यांवर किरकोळ कारवाई केली जात आहे.

उल्हानसागर शहरात सद्य स्थितीत ४३१ कोरोना रुग्ण हे उपचार घेत आहेत. दिवसाला नवीन कोरोना रुग्ण आढळण्याचा आकडा हा २५ च्या आसपास स्थिरावला आहे, असे असतानाच उल्हासनगरच्या बाजूला असलेल्या कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. यामुळे उल्हासनगरचे नागरिक हे अति उत्साहात बिना मास्क फिरत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले कि ‘जे नागरिक विनामास्क असतील त्यांना पहिल्या वेळेस ५०० रुपये, दुसऱ्या वेळेस १ हजार रुपये दंड आणि तिसऱ्या चुकीला थेट स्थानिक पोलीस ठाण्यात दक्षता कमिटी गुन्हा दाखल करते.’

- Advertisement -

आयुक्तांच्या आदेशाला सत्ताधाऱ्यांचा ठेंगा

उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त कलानी कुटुंबाकडून कलानी क्लिनिकची सुरुवात करण्यात आली. या क्लिनिकमध्ये नागरिकांना २० रुपयात उपचार होणार आहे. या चार क्लिनिकचे थाटामाटात गुरुवारी ओपनिंग करण्यात आले. यावेळी खुद्द ओमी कलानी हे विनामास्क गर्दीमध्ये फिरताना दिसून आले. तसेच कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टंन्सच्या नियमांचे पालन होताना दिसून आले नाही. त्यांचे हे वर्तन कोरोनाला आमंत्रण देत असल्याचे दिसून आले.

पालिकेच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उल्हासनगर महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांनी प्रभाग निहाय दक्षता कमिटीचे गठन केले आहे. या समितीचे अध्यक्ष हे प्रभाग सभापती आहेत. तर प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, अजयकुमार एडके, तुषार सोनवणे, अजित गोवारी हे शासकीय सदस्य सचिव, प्रत्येक ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे शासकीय सदस्य व कर्मचारी, स्वछता निरीक्षक हे सदस्य असणार आहेत. दक्षता समिती ही संनियंत्रण व पर्यवेक्षक समिती मधील महापौर लिलाबाई आशान, उपमहापौर भगवान भालेराव, आयुक्त डॉ.राजा दयानिधी, सभागृनेते राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते किशोर वनवारी, उपायुक्त मुख्यालय मदन सोंडे यांच्या नियंत्रणाखाली काम करणार आहे. आता हि प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची मजबूत फळी टिओके प्रमुख ओमी कलानी आणि त्यांच्या बरोबर विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करतात का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनामध्ये साडेचार लाखांहून अधिक युनिट रक्त संकलन; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -