पालकांच्या डोक्याला होतोय ताप, मोबाईल गेम्सना अश्लीलतेचा शाप

जाहिरातींतून मुलांना अश्लीलतेची चटक

Mumbai
Mobile

आपली मुले जर मोबाईलवर कॅण्डी क्रॅश, पब्जी, क्रिकेट किंवा इतर गेम खेळत असतील तर पालकांनी खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. या मोबाईल गेम्समध्ये सध्या अश्लील जाहिरातीचा सुळसुळाट वाढला आहे. याकडे लहान मुले आकर्षित होत असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, यात टीक टॉकच्या माध्यमातूनदेखील जाहिरात केली जाते. त्याचबरोबर सध्या अनेक जाहिराती या अ‍ॅनिमिटेड पध्दतीने प्रसिद्ध केल्या जात आहेत. याकडे लहान मुले मोठ्या प्रमाणात आर्कषित होत आहेत, अशी माहिती सायबर तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

सध्या घरात प्रत्येकाकडे मोबाईल असतो. त्यावर इंटरनेट असते. मोबाईल हा आता छोटा कॉम्प्युटरच झालेला आहे. लहान मुले या मोबाईलवर सर्रासपणे विविध गेम्स खेळत असतात. याचाच गैरफायदा घेऊन मोबाईल गेम्स खेळणार्‍या विद्यार्थी आणि किशोरवयीन मुलांना अश्लील जाहिरातींच्या जाळ्यात पकडले जात आहे. या जाहिरातीत प्रामुख्याने नेटफ्लिक्स, खाण्याचे पदार्थ यासारख्या जाहिरातींबरोबरच अश्लील संदेश देणारे, अश्लील फोटो किंवा अश्लील व्हिडिओच्या जाहिराती वेगाने वाढत आहेत. किशोरवयीन मुलांना या जाहिरातींचे कुतूहल असल्यामुळे ते याकडे जास्त आकर्षित होऊन त्यांना त्या पाहण्याचे जणू व्यसनच लागते, असे मत सायबर तज्ज्ञ उन्मेश जोशी यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

बर्‍याचवेळा आपण लहान मुलांना गेम खेळण्यासाठी आपला मोबाईल देतो. त्यांना क्रॅण्डी क्रशसारखा साधा गेम खेळण्यासाठी देतो असलो तर अशा लोकप्रिय गेम्सचा वापर पॉप अप जाहिरातदार करत आहेत. या गेम्सची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन ते खेळणार्‍यांना आपल्याकडे वळविण्यासाठी इतर जाहिरातींबरोबर अश्लील जाहिरातीदार जोरदार शिरकाव करतात. यात आकर्षक तसेच अर्धनग्न छायाचित्रांचा वापर केला जातो. त्याकडे किशोरवयीन मुले आर्कषित होतात. शाळा आणि कॉलेजांमध्ये त्यांनी याबद्दल अनेकवेळा मित्रांकडून काही गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यामुळे ते नेमके काय आहे, या विषयीचे कुतूहल शमवण्यासाठी ते या जाहिरातींवर क्लिक करतात. या अशिलतेच्या जाळ्यातून मुलांना वाचवण्यासाठी प्रामुख्याने पालकांची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी मुले मोबाईलवर नक्की काय पाहत आहेत, याविषयी सजग राहून मुलांना त्यापासून रोखण्याची गरज आहे.

पालकांनो काय काळजी घ्याल

* आपल्या मोबाईलमध्ये अ‍ॅण्टी वायरस यंत्रणा डाऊनलोड करुन घ्या.
* मुले कोणता मोबाईल गेम डाऊनलोड करीत आहेत, त्याकडे लक्ष द्या.
* अशाप्रकारे कोणत्याही जाहिरातीबद्दल मुलांनी विचारणा केल्यास त्यांच्याशी मोकळेपणाने बोला.
* पॉ पप जाहिरात कशी बंद करतात, याची युट्यूबवरुन माहिती घ्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here