Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई 'इतके दिवस पोलीस झोपले होते काय? राजकीय सूडबुद्धीतून कारवाई'

‘इतके दिवस पोलीस झोपले होते काय? राजकीय सूडबुद्धीतून कारवाई’

प्रसाद लाड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले

Related Story

- Advertisement -

राज्यात शिवसेना नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला असतानाच आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनाही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने समन्स बजावला होता. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. मुंबई महापालिकेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी प्रसाद लाड यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली असून लाड यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण 2009मधील असताना पोलिसांनी आता नोटीस पाठवण्याची गरज काय? इतके दिवस पोलीस झोपले होते काय? असा सवाल करतानाच केवळ सूडबुद्धीतूनच मला नोटीस बजावण्यात आली आहे, असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.

20 दिवसांपूर्वी प्रसाद लाड यांना नोटीस पाठवण्यात आली होती.त्यानंतर आता त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रसाद लाड यांच्यावर बीएमसीतील घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पाठवलेल्या नोटीसीबद्दल माहिती दिली. ते म्हणाले या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही, तर सुडबुद्धीने ही नोटीस पाठविण्यात आली आहे. असा आरोप प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. दोन कंपन्यांच्या वादातला हा भाग आहे. पण त्या कंपन्यांच्या संदर्भात दाखल झालेल्या एफआयआरमध्येही माझं कुठेही नाव नाही, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत माझं कुठंही नाव नाही. हे सरकार फक्त आमच्या विरोधात कारवाया करत आहे. हा खोटा गुन्हा असून तो रद्द करण्यात यावा यासाठी मी कोर्टात धाव घेणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार भाजपविरोधात षडयंत्र रचत आहे. तक्रारदाराला बोलवून स्टेटमेंट करून घेण्यात आली आहे. मी आता कोणाविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार नाही आहे. पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील, असं प्रसाद लाड म्हणाले. मी सात दिवसाचा वेळ मागितला आहे त्यानुसार मी त्यांना पुरावे सादर करेन. नोटीसीबद्दल सर्व माहिती माझ्या जवळ आहे.  आतापर्यंत किरीट सोमैय्या आणि मनोज कोटक यांनी अनेक पालिकेतील घोटाळे उघड केले आहेत. त्यांच्यावर  का कारवाई केली जात नाही? असा सवाल लाड यांनी केला. इतर लोकांनी पत्रकार परिषदेत जशी उत्तरे दिली तसंही मी करणार नाही. मी माझ्या कामात नेहमीच यशस्वी झालेलो आहे. चौकशीच करायची असेल तर महापालिकेत अनेक घोटाळे झाले आहेत. तिथेही तपास करा. भाजप नेते किरीट सोमय्या आणि खासदार मनोज कोटक कागदपत्रं घेऊन घोटाळे बाहेर काढत आहेत. मग तिथे कारवाई कधी करणार? उद्यापासून मीही पालिका घोटाळ्याच्या फायली द्यायला सुरुवात केली तर?, असा टोलाही त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.

- Advertisement -