Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम बलात्काराची शिक्षा भोगून आलेल्या आरोपीकडून पुन्हा बलात्काराचा गुन्हा

बलात्काराची शिक्षा भोगून आलेल्या आरोपीकडून पुन्हा बलात्काराचा गुन्हा

३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

Related Story

- Advertisement -

बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगून परत आलेल्या आरोपीने पून्हा ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील रायसेनमध्ये घडली आहे. पीडित महिलेने याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपी हरिकिशनला अटक केली आहे. सांची सलामतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आरोपीने महिलेवर बलात्कार केला. यावेळी पीडित महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला परंतु कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. यानंतर आरोपीने बलात्कार पीडित महिलेला धमकावत घटनास्थळावरून पळ काढला. पीडित महिलेने पोलिस स्टेशन गाठत घडला प्रकार पोलिसांना सांगितला, याप्रकरणी आरोेपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सेमरा गावात पीडित विधवा महिला घरात एकटी झोपली होती. याचसंधीचा फायदा घेत आरोपीने घरात घुसून पीडित महिलेवर तीन तास बलात्कार केला. याप्रकरणी सांची सलामतपूर पोलीसांचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला पोलिसांनी त्याच्या गावातून अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात ०३/२१ कलमाअंतर्गत ३७६ (२ एन), ४५०, ३२३, ५०६ आयपीसी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिस उपनिरिक्षक संगीता काजले यांच्या माहितीनुसार,आरोपी हरिकिशन एक महिन्यापूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगून आला होता. आरोपीविरोधात सलामतपूर पोलिस ठाण्यात एका आदिवासी मुलीवर बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर त्याने पुन्हा अंबाडी गावातील एकट्या राहणाऱ्या विधवा महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणात पोलिस घटनास्थळी वेळीच पोहचले नसते तर आरोपी मध्यप्रदेशातून पळून जाण्याच्या तयारीत होता.

- Advertisement -