घरमुंबईविद्यापीठ कॉलेजच्या वादात अडकला निकाल

विद्यापीठ कॉलेजच्या वादात अडकला निकाल

Subscribe

परीक्षा देऊनही विद्यार्थी ठरले नापास, भवन्स कॉलेजमधील विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत

मुंबई विद्यापीठ आणि कॉलेज यांच्यामधील असलेले असमन्वयााच फटका यंदा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना बसला आहे. प्रॅक्टिकल परीक्षेच्या गुणाबाबत सुरु असलेल्या वादात विद्यार्थ्यांचा निकाल लटकला असून या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमातील प्रवेश टांगणीला लागले आहे. गिरगाव चौपाटी येथील भवन्स कॉलेजमधील हे सर्व विद्यार्थी असुन गेल्या अनेक पंधरा दिवसांपासून हे विद्यार्थी निकालासाठी विद्यापीठात वणवण फिरत आहेत.

मुंबई विद्यापीठातर्फे टीवायबीएस्सी अभ्यासक्रमाचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. निकाल वेळेआधीच जाहीर झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला खरा. पण भवन्स कॉलेजमधील झूलॉजी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मात्र निकाल पाहून मोठा धक्काच बसला आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या या निकालात या विद्यार्थ्यांना चक्क नापास ठरविण्यात आले असून त्यांच्या गुणपत्रिकेवर गैरहजर असा शेरा मारण्यात आला आहे. प्रात्यक्षिक परीक्षांच्या रकान्यात विद्यार्थ्यांना गैरहजर असा शेरा देण्यात आला असून परीक्षा दिली असताना देखील हा शेरा आल्याने विद्यार्थ्यांसह प्राध्यापक देखील चक्रावले आहेत. त्यामुळे कॉलेजातील झूलॉजी अभ्यासक्रमाचे सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा भवनात धाव घेतली आहे. तर प्रात्यक्षिकांचे गुण वेेळेवर न पाठविल्याने हा निकाल रखडल्याचे उत्तर विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. मात्र कॉलेज प्रशासनाने गुणांची माहिती वेळेवर पाठविल्याचा दावा केल्याने या निकालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा विद्यापीठाकडे दाद मागितली असता, निकालात दुरस्ती करण्यासाठी बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये यासंदर्भातील प्रस्ताव ठेवावा लागेल, त्यानंतर तुमचे निकाल जाहीर करण्यात येईल, असे उत्तर देण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, यासंदर्भात कॉलेज प्रशासनाने देखील विद्यापीठाकडे पत्र पाठवित निकालासंदर्भात माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यानंतरही अद्याप कोणतेही ठोस उत्तर विद्यापीठाकडून देण्यात आलेले नसल्याने हे विद्यार्थी निकालासाठी वणवण फिरत आहेत. परीक्षा वेळेवर देऊनही जर आम्हांला या त्रासातून जावे लागेत असेल तर ही बाब गंभीर असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. आमची कोणत्याही प्रकारची चूक नाही. मात्र त्यानंतरही निकाल दिला जात नाही. जर निकाल तांत्रिक अडचणीमुळे जाहीर करता येत नसेल तर त्यासंदर्भातील पत्रक तरी विद्यापीठाने द्यावे, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात योग्य ती माहिती घेण्यात येईल, त्यानंतरच सर्व माहिती आपल्याला देण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनातर्फे आपलं महानगरला देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -