घरमुंबई२०० विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुसाट

२०० विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुसाट

Subscribe

६ लाख ५२ हजार ६४४ रेल्वे तिकिटे झाली आरक्षित

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वेकडून १ जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेर्‍या सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार या गाड्यांचे ऑनलाईन आरक्षण २१ मे पासून सुरू झाले आहे. आतापर्यंत ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू होताच तीन दिवसांत या गाड्यांची ६ लाख ५२ हजार ६४४ तिकिटे आरक्षित झाली, तर भारतीय रेल्वेने शुकवारी 21 मे 2020 ला आरक्षण खिडक्या, सामायिक सेवा केंद्र (सीएससी) आणि तिकिटिंग एजंट्समार्फतही तिकिटांच्या आरक्षणास परवानगी दिली. त्यामुळे विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुसाट होताना दिसून येत आहे.

देशातील वेगवेगळ्या भागातून २०० वातानुकूलित आणि सामान्य श्रेणीच्या ट्रेन धावणार आहेत. सीएसएमटी, एलटीटी, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस येथून देशभरात ट्रेन धावणार आहेत. देशातील मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी ‘श्रमिक विशेष ट्रेन’ चालविण्यात १ मे पासून चालविण्यात येत आहे. २१ मे च्या सकाळी १० वाजतापासून आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरू झाले आहे. तसेच 1 मे पासून सुरू झालेल्या सध्याच्या श्रमिक विशेष गाड्या आणि 12 मे 2020 पासून सुरू झालेल्या विशेष वातानुकूलित गाड्यांव्यतिरिक्त (30 गाड्या) आहेत.

- Advertisement -

आयआरसीटीसीचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अ‍ॅपद्वारे या गाड्यांच्या तिकिटांसाठीचे ऑनलाईन आरक्षण केले जात आहे. भारतीय रेल्वेने शुक्रवारी 21 मे 2020 ला आरक्षण खिडक्या, सामायिक सेवा केंद्र (सीएससी) आणि तिकिटिंग एजंट्समार्फतही तिकिटांच्या आरक्षणास परवानगी दिली.14 लाख 13 हजार 277 प्रवासी क्षमता असलेल्या या गाड्यांसाठी 6 लाख 52 हजार 644 ऑनलाईन तिकिटे आरक्षित करण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -