घरमुंबईगटाराच्या दुर्गंधीमुळे आरपीएफच्या महिला जवान त्रस्त

गटाराच्या दुर्गंधीमुळे आरपीएफच्या महिला जवान त्रस्त

Subscribe

रेल्वे प्रवासी आणि रेल्वे परिसर यांच्या सुरक्षेची काळजी घेणार्‍या आरपीएफच्या विरारमधील महाराष्ट्र सुरक्षा बलच्या महिला जवानांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या महिला कर्मचार्‍यांना ज्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी गटाराची प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी असल्याने कर्मचार्‍यांना त्रास होत आहे.

विरार रेल्वे स्थानकातून दररोज हजारो महिला नोकरी व इतर कामांसाठी मुंबईला ये-जा करत असतात. पहाटे सुटणार्‍या पहिल्या ट्रेनपासून रात्री शेवटच्या ट्रेनपर्यंत या महिला प्रवाशांना प्रवासात कोणत्याही प्रकारच्या समस्येला तोंड द्यावे लागू नये, यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बलच्या महिला जवान रेल्वे डब्यात आणि फलाटावर आपले कर्तव्य बजावत असतात. या महिला जवान फक्त प्रवाशांचीच काळजी घेत नाहीत तर रेल्वेच्या हद्दीत फेरीवाले बसणार नाहीत, यावरही त्यांचे लक्ष असते. त्यासाठी विरार रेल्वे स्थानकातील मुख्य गेटवरच या कर्मचारी तैनात असतात. गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊ नये म्हणूनही लक्ष ठेवावे लागते. या गर्दीत महाराष्ट्र सुरक्षा बलच्या महिला जवान आपले कर्तव्य निभावत उभ्या राहतात.

- Advertisement -

या कर्मचार्‍यांना गेटलगत असलेल्या जिन्याजवळ एक टेबल आणि खुर्ची उपलब्ध करून देण्यात आली. त्या जमिनीखालून गटाराची पाईपलाईन जात असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. एक सेकंदही तेथे उभे राहणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत या महिला जवान पहाटेपासून रात्रीपर्यंत तेथे बसून आपले कर्तव्य बजावत असतात. युनिफॉर्मवर असल्यामुळे नाकावर रुमालही बांधू शकत नाहीत. काही जणींना तर या दुर्गंधीने मळमळणे, उलटी येणे असे प्रकार झाले आहेत, पण अशा परिस्थितीतही त्यांनी कर्तव्यात कसूर केलेली नाही. जरा खालच्या बाजूला (जिन्याखाली) आम्हाला जागा द्या, अशी मागणी या महिला जवानांनी केली आहे, पण त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या महिला जवान त्रस्त झाल्या आहेत. आम्ही प्रवाशांची आणि परिसराची सुरक्षा करतो, आमच्या आरोग्याची सुरक्षा कोण करणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -