घरमुंबईगडचिरोली स्फोट प्रकरणी एसडीपीओ शैलेश काळे निलंबित

गडचिरोली स्फोट प्रकरणी एसडीपीओ शैलेश काळे निलंबित

Subscribe

गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा मुद्दा आमदार प्रकाश गजभिये यांनी अधिवेशनात मांडला.

काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी आज सभागृहात लक्षवेधीच्या माध्यमातून गडचिरोली येथील जामखेडा गावात रस्त्यावर नक्षलवाद्यांनी पुरून ठेवलेल्या स्फोटकामुळे झालेल्या घटनेत १५ पोलीस शहीद झाले हा विषय मांडला. यावेळी या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून शहीद झालेल्या अंमलदाराच्या वारसांना कामावर घ्यावे, अशी मागणी गडभिये यांनी केली. तसेच या घटनेत शहीद झालेल्या अंमलदाराच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचीही मागणी आम्ही गजभिये यांनी यावेळी केली.

दरम्यान, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकार्‍याला निलंबित केले जाईल तसेच शहीद झालेल्या अंमलदाराच्या वारसांना ७ दिवसात नोकरीवर ठेवले जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे गडचिरोलीतील आयईडी स्फोट प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी (एसडीपीओ) शैलेश काळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

- Advertisement -

नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा मुद्दा आमदार प्रकाश गजभिये यांनी अधिवेशनात मांडला.

गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा मुद्दा आमदार प्रकाश गजभिये यांनी अधिवेशनात मांडला.

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜೂನ್ 21, 2019

शैलेश काळे यांनी योग्य काळजी न घेतल्यामुळेच शीघ्र कृती दलातील १५ जवान मृत्यूमुखी पडले असा आरोप करण्यात येत होता. याबाबत दीपक केसरकर यांनी सभागृहात माहिती दिली.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

महाराष्ट्र दिन, १ मे रोजी गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा जवळील एका पुलावर क्युआरटीच्या जवानांची एक जीप नक्षलवाद्यांनी भूसुरंग स्फोट करून उडवून टाकली होती. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते. हे १५ ही जवान गडचिरोली जिल्ह्याचेच रहिवाशी होते.

हेही वाचा –

…जेव्हा विरोधक घेतात कृषी मंत्र्यांच्या आंदोलक बहिणीची बाजू

मोदींना जीवे मारण्याची धमकी; मल्याळम भाषेत लिहिली नोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -