‘विरोधात कधी बसायला मिळतं याची वाट पाहतोय’

भाजप - शिवसेना कधी एकत्र सत्ता स्थापन करते याची मी वाट पाहत असून विरोधात कधी बसालया मिळत याची वाट पाहत आहे', अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Mumbai
Sharad Pawar on Government formation in maharashtra

देशभरात अयोध्या निकालावरून प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात न्यायालयानं दिलेल्या निकालाचं स्वागत केलं. निकालाचा सर्वांनी आदर करायला हवा. हा वाद निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाचा उपयोग होईल. त्यामुळे शांतता आणि संयम बाळगावा,’ असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. तसेच यावेळी त्यांना राज्यात सत्ता स्थापनेविषयी विचारले असता ते म्हणाले की, कोणी कोणाला खोटे ठरवू नये, एवढ्या वर्षाचे भाजप – सेना मित्र पक्ष आहेत. तसेच भाजप – शिवसेना कधी एकत्र सत्ता स्थापन करते याची मी वाट पाहत असून विरोधात कधी बसालया मिळत याची वाट पाहत आहे’, असे देखील ते म्हणाले आहेत.

हा निर्णय एका राज्याचा नसून संपूर्ण देशाचा आहे

अयोध्येचा निकाल हा केवळ एका राज्याचा नसून संपुर्ण देशाचा आहे. तसेच या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. त्याप्रमाणे सर्व नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करुन शांतता राखावी, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली आहे.

भाजप – सेनेने सरकार स्थापन कराव, असे आम्हाला वाटत आहे. पण तसे झाले नाही तर आम्हाला याबाबत विचार करता येईल. मात्र, कालच्या भाजप – सेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे वाटत नाही. तसेच भाजप -सेनेच्या नेत्यांनी एकत्र येणे जरी ठरवले तरी मात्र, राज्याच्या हिताचे विचार करतील असा विश्वास महाराष्ट्राची जनता यावरती विश्वास ठेवणार नाही. त्याचप्रमाणे नाईलाजाने एकत्र आले तर सरकार फार काळ टिकेल, असे वाटत देखील नाही.  – प्रफुल्ल पटेल


हेही वाचा – Ayodhya Verdict : व्हॉट्सअॅप ग्रुप झाले सतर्क आणि केली ‘ही’ गोष्ट


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here