घरमुंबईशिळफाटा ते रांजनोली नाका सहापदरी रस्त्याचे काम चालू होणार

शिळफाटा ते रांजनोली नाका सहापदरी रस्त्याचे काम चालू होणार

Subscribe

शिळफाटा ते रांजनोली नाका पर्यंतचे सहापदरी सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम पुढील आठवड्यात चालू होणार आहे.

निवडणुकीची आचारसंहिता आणि अतिवृष्टीमुळे शिळफाटा ते रांजनोली नाकापर्यंतचे सहापदरी सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही. ही कामे तातडीने सुरू होण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरूवारी महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे (MSRDC) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल गायकवाड यांची मुंबईतील मलबार हील येथील कार्यालयात भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानुसार पुढील आठवड्यात सदर कामे सुरू करण्याचे आश्वासन गायकवाड यांनी दिले आहे, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली.

रस्ते हे सिमेंट कॉंक्रीटचेच

शिळफाटा येथून मानपाडा रोडवरून डोंबिवली कडे येणाऱ्या रस्त्यावरील होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीला नागरिक त्रस्त झाले आहेत. कोंडीवर मार्ग काढण्यासाठी शिळ फाटा येथे उड्डाणपूल व्हावा यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी केलेल्या मागणीला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने यापूर्वीच एमएमआरडीकडून मंजूरी मिळाली आहे. या कामाबरोबरच पुढे डोंबिवली मानपाडा रस्त्यापासून प्रीमियर कंपनी, मानपाडा रोड कडे येणारे रस्ते जे चार पदरी आहेत ते सहापदरी व्हावेत यासाठीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीनुसार विधानसभा निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. प्रथमतः सदर रस्ते हे डांबराचे बनवण्याचे प्रस्तावित होते. परंतु डांबराच्या रस्त्यांचा पूर्वानुभव चांगला नसून त्यावर वारंवार खड्डे पडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सदर रस्ते हे डांबराचे न बनविता ते सिमेंट कॉंक्रीटचेच बनवावेत, असा आग्रह डॉ. शिंदे यांनी धरला त्यानुसार सदर रस्ते हे सिमेंट कॉंक्रीटचेच बनवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

- Advertisement -

तिसऱ्या पत्रीपूलाचे कामही त्वरीत चालू होणार

सध्या अस्तित्वातील ४ पदरी रस्ते तसेच ठेउन दोन्ही बाजूला नव्याने एकेक लेनचे सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते करण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर अस्तित्वातील ४ पदरी रस्त्याचे कॉंक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार आहेत. सदरकामापूर्वी दुतर्फा गटारे, फुटपाथ, पायवाट यांची कामे पूर्ण करण्याचेही ठरवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात प्रीमियर कंपनीपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पुढे रांजनोली नाका ते दुर्गाडी किल्ल्यापर्यंतचे काम करण्यात येणार असून यात एकूण १० कि. मी रस्त्याची कामे होणार आहेत. सदर रस्ते हे दुर्गाडी मार्गापर्यंत होणार आहेत. मात्र रस्त्याच्या मध्यभागी पत्रीपूल असून त्यावर नेहमीच वहातुककोंडी होत असते, त्यातच या सहापदरी रस्त्यामुळे त्यात अधिक वाढ होणार आहे. त्यामुळे तिसऱ्या पत्रीपूलाचे कामही त्वरीत चालू करण्याचे निवेदन डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार तिसऱ्या पत्रीपूलाचे कामही चालू करण्यात आले आहे. या रस्तारुंदीकरणात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दितील काही जमीनी हस्तांतरित करणे जरूरीचे आहे. यावर तोडगा काढून सदर जमिनी त्वरीत एमएसआरडीसीकडे हस्तांतरित व्हाव्या म्हणून शुक्रवारी कडोंमपाचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगीतले..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -