घरमुंबईशिवसेनेने केडीएमसीतील भाजपच्या उपमहापौरांचा पाठींबा काढावा

शिवसेनेने केडीएमसीतील भाजपच्या उपमहापौरांचा पाठींबा काढावा

Subscribe

काँग्रेसच्या जिल्हाध्याक्षांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सत्तेवर आल्याने राज्यात शिवसेनेने भाजपसोबतचे संबंध तोडले आहेत. त्यामुळे भाजपने नैतिकतेच्या आधारावर केडीएमसी उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा. तसेच शिवसेनेनेही केडीएमसीतील भाजपसोबतचे संबंध तोडून उपमहापौरांचा पाठींबा काढावा अशी मागणी काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

शिवसेनेने भाजपसोबतचे संबंध तोडणे अनिवार्य

महाराष्ट्रात नुकतेच स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत चालावे आणि तिन्ही प्रमूख घटक पक्षांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. तर पुढील वर्षी २०२० मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुकीची पूर्व योजना म्हणून शिवसेनेने भाजपसोबत असणारे संबंध तोडणे अनिवार्य असल्याचे पोटे यांचे म्हणणे आहे. कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या पाठिंब्यावर असलेल्या भाजपच्या उपमहापौराने राजीनामा देणे आणि शिवसेनेनेही भाजप उपमहापौरपदाचा पाठिंबा काढून घ्यावा. जेणेकरून स्थानिक पातळीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये योग्य समन्वय होऊ शकेल, असेही पोटे यांनी स्पष्ट केले आहे.

केडीएमसीमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर नव्हे तर भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा महापौर बसलेला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्य शासनात शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळाले असून, केडीएमसीचा त्याच्याशी संबंध नाही. त्यामूळे आम्हाला राजीनामा देण्याची गरज नसून काँग्रेसने आम्हाला नैतिकता शिकवू नये.

– वरुण पाटील, भाजप नगरसेवक केडीएमसी 

- Advertisement -

२०१४ मध्ये राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला सत्तेमध्ये नेहमीच दुय्यम स्थान देण्यासह एक प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेला संपवण्याची कोणतीही संधी सोडली नसल्याचा घणाघात करत शिवसेनेने भाजपबरोबरचे सर्व संबंध तोडावेत. तसेच भाजपने नैतिकतेच्या आधारावर कल्याण डोंबिवली महापालिकेतील उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सचिन पोटे यांनी केली आहे.


हेही वाचा – डोंबिवली ट्रेनच्या गर्दीचा विषय थेट संसदेत; सुप्रिया सुळेंनी केली ही मागणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -