शिवसेनेच्या स्थानिय लोकाधिकार समिती अधिवेशनाला सुरुवात

Mumbai

स्थानिय लोकाधिकार समिती महाअधिवेशनला सुरुवात झाली असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, सुभाष देसाई, अनिल देसाई आदी राजकीय नेत्यांनी या महाअधिवेशनाला हजेरी लावली आहे. कार्यक्रमादरम्यान बोलताना ज्येष्ठ नेते मनोहर जोशी म्हणाले की, हा कार्यक्रम ठराविक कार्यकर्त्यांसाठी राहिलेला नसून, स्थानिय लोकाधिकार समितीचे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आहे. मी या संस्थेत अनेकवेळा हजर होतो. या संघटनेच्या लोकांना भेटायला मला नेहमीच आवडतं. या संस्थेने शिवसेनेच्या संघटनेचे काम पुढे नेलं आहे. दुसरे कुणाचे सरकार असेल तर ८० टक्के मराठी माणसांसाठीही नोकऱ्या तयार होणार नाही. त्यामुळेच शिवसेनेचा या निवडणुकीत प्रचंड विजय होईल.

मराठी विषय सक्तीचा असावा

कार्यक्रमादरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, की महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी यावी असा कायदा झाला पाहिजे. महाराष्ट्राच्या शाळांमध्ये पहिले ते बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा असावा असावा, असा कायदा विधिमंडळात करण्याची मागणी आम्ही करतो. आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत. जोवर हा कायदा होत नाही तोपर्यंत शिवसेना मागे हटणार नाही. मुंबईमध्ये आर्थिक आंतर राष्ट्रीय केंद्र व्हावं ही आमची मागणी आहे. यासाठी आंदोलन करावं लागलं तरी आम्ही ते करू पण हे केंद्र मुबंईत व्हावं ही आमची मागणी आहे. जे उद्योग 80 टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या देणार नाहीत तर त्यांचा टॅक्सचा परतावा देणार नाही. भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रस्थाव धाब्यावर बसवला जात असेल तर त्याला शिवसेना स्टाइलने उत्तर द्यावे लागेल, असंही सुभाष देसाई म्हणाले.

युवासेनेच्या सिनेट निवडणुकांचं श्रेय तुमचंच…

या संघटनेकडून जेव्हढे शिकावं तेवढं कमी आहे, असं मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, की ही संघटना भूमीपुत्रासाठी लढली आहे. यांच्यामुळेच शिवसेना ही खूप पुढे गेली आहे. आपल्या या संघटनेने जे विषय सोडवले आहेत ते इतर कोणत्याही देशात सुटलेले नाहीत. आजही शिवसेना भवनमध्ये आपण सर्व पद्धतीचे ट्रेनिंग देतो. आज प्रत्येक गोष्ट मुंबईतून चालते याचे सर्व श्रेय सर्व तुम्हालाच जाते. शिवसेनेचा कणा जसा स्थानिय लोकाधिकार समिती आहे तसे युवासेनेच्या सिनेट निवडणुकांचं श्रेयदेखील तुमचं आहे.

स्थानिय लोकाधिकार समिती हा महासंघ ४५ वर्षाचा झाला. गेल्या ४५ वर्षाच्या प्रवाहात जेवढ्या निवडणूका झाल्या त्यामध्ये प्रवाहीपणे या संघटनेने योगदान दिले आहे. ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरीत स्थान मिळावे यासाठी बाळासाहेबांनी ही संघटना काढली. स्थानिय लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते आपल्यावर कुणी केस करतील का याची कधीच चिंता करत नाहीत, असं मत आमदार आनंदराव अडसूळ यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here