घरCORONA UPDATECoronavirus: सोशल डिस्टन्सिंगने करोनाचा धोका ६२ टक्के कमी - आयसीएमआर

Coronavirus: सोशल डिस्टन्सिंगने करोनाचा धोका ६२ टक्के कमी – आयसीएमआर

Subscribe

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून जर सोशल डिस्टंसिंग पाळले तर करोनाचा धोका ६२ टक्के कमी करण्यास मदत होऊ शकते, असा निष्कर्ष समोर आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना गर्दी टाळण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. तरीही लोकं ऐकत नसून गर्दी कमी होताना दिसत नाही. याचसाठी आयसीएमआर म्हणजेच इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनातून जर सोशल डिस्टंसिंग पाळले तर करोनाचा धोका ६२ टक्के कमी करण्यास मदत होऊ शकते, असा निष्कर्ष काढला आहे. आयसीएमआरचे हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये छापण्यात आले आहे.

जगभरात करोना व्हायरसचा धोका वाढला आहे. करोनाने होणारा कोव्हिड-१९ हा झपाट्याने पसरणारा आजार आहे. त्यामुळे करोनाला आपल्या घरापासून, कुटुंबापासून आणि समाजापासून दूर ठेवायचे असेल तर सोशल डिस्टंसिंगने शिवाय पर्याय नाही. आपण घरी राहिल्याशिवाय करोनावर आळा घालू शकत नाही. संशोधन क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी संस्था इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने करोनाचा धोका टाळण्यासाठी सोशल डिस्टंसिंग किती महत्त्वाचे आहे. यावर संशोधन केले आहे. या संशोधनासाठी आयसीएमआरने मॅथमॅटीकल मॉडलिंगचा वापर केला.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: मुंबईत आज २२ नव्या कोरोना बाधितांची नोंद | एकूण रुग्ण १८१

ही माहिती सर्वांसाठी आवश्यक 

आयसीएमआरच्या माहितीनुसार, करोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केल्याने आणि सोशल डिस्टंसिंग योग्य पद्धतीने पाळल्याने आपण करोनाचा समाजात प्रसार होण्यापासून आळा घालू शकतो. आयसीएमआरच्या माहितीनुसार, सकारात्मक घटनेमध्ये करोनाची लक्षणे असलेल्या ५० टक्के लोकांना, लक्षणं दिसून आल्याच्या तीन दिवसाच्या आत क्वारंटाइन केले तर, करोना पसरण्याचा धोका ६२ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. साधारण: तीन दिवसांनी करोनाची लक्षणे आढळलेल्या ५० टक्के लोकांना आपण क्वारंटाइन केले किंवा त्यांची तपासणी केली. तर या आजाराचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे भारतातील सामाजिक आरोग्य व्यवस्थेवर ताण पडणार नाही.

- Advertisement -

एकच उपाय, घरात बसा 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी भारतीयांशी संवाद साधताना, करोनावर मात करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व अधोरेखित केले. करोनाला आपल्या घरी, कुटुंबीयांपासून आणि समाजापासून दूर ठेवायचे असेल तर, २१ दिवस घराबाहेर लक्ष्मण रेषा आखून ठेवा. घराबाहेर पडू नका, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. भारतात केंद्र सरकारने लागू केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन म्हणजे सोशल डिस्टंसिंगसाठीचे एक महत्त्वाचे पाउल आहे, असे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे.

या शहरांमध्ये झाले संशोधन 

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, करोनाचा धोका कमी करण्यासाठी व्हायरसची चैन तोडण्याचे सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. करोनाची ही चेन ब्रेक झाली तरच, भारतात करोनाचा धोका कमी होण्यास मदत होईल. या संशोधनासाठी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू यासारख्या शहरांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांच्या मते या शहरात परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. कोरोना व्हायरसमुळे आजारी असलेल्या एका व्यक्तीकडून हा आजार १.५ ते ४.९ व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सोशल डिस्टंसिंग योग्य पद्धतीने पाळले तर करोना लोकांमध्ये पसरणार नाही. हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये छापण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -