Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Coronavirus: मुंबईत आज २२ नव्या कोरोना बाधितांची नोंद | एकूण रुग्ण १८१

Coronavirus: मुंबईत आज २२ नव्या कोरोना बाधितांची नोंद | एकूण रुग्ण १८१

Subscribe

महाराष्ट्रात आज नवीन २८ रुग्णांची नोंद या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत.इतर ४ रुग्ण पालघर -वसईविरार आणि नवी मुंबई परिसरातील आहेत. सध्या बाधित आढळलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या १०४ रुग्णांना करोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या आता ६ झाली आहे. राज्यातील २६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचं ही स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यात आज एकूण ३२३ जण विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २६ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,२९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५ हजार ९२८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्येही विलगीकरण केंद्र

- Advertisement -

दिवसेंदिवस मुंबईसह राज्यातील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. यासाठी महापालिका प्रशासन आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ३५ खाटांचे विलगीकरण केंद्र आणि बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. ही सुविधा नागरिकांसाठी मोफत असणार आहे. पवईतही २५० खाटांचं विगलीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. नागरिकांना विविध किराणावस्तू आणि भाजीपाला इत्यादी सुविधांसाठी ऑनलाईन पद्धती वापरण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. लोकांनी जर ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी मागवल्या तर रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि संसर्ग होण्यापासून बचाव करता येईल.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. ही संख्या कमी व्हावी यासाठी गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तरीही लोकांची गर्दी कमी होत नाही. शिवाय, आता भारत तिसऱ्या टप्प्यात असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे, केंद्र सरकारनेही राज्यांच्या मदतीने ज्या ठिकाणी करोनाचे अधिक रुग्ण आहेत त्या भागांमध्ये लक्ष केंद्रीय केलं आहे. करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव समाजात होऊ याची पूरेपूर काळजी घेतली जात आहे. तर, शनिवारी देशात कोरोनाने दोन जणांचा बळी घेतला आहे.

- Advertisement -

भारतात २०० हून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही ९३५ वर पोहोचली आहे. प्रत्येक राज्यांत कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल बनवण्यात येणार आहे. १७ राज्यांनी या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यामुद्द्यावर सतत राज्यांच्या संपर्कात असून त्यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -