घरमुंबईस्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे सिनेमॅटोग्राफर निर्मल जानी यांचे निधन

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे सिनेमॅटोग्राफर निर्मल जानी यांचे निधन

Subscribe

लोकप्रिय स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या छायाचित्रणाची संपूर्ण जबाबदारी असलेले ज्येष्ठ छायाचित्रकार निर्मल जानी यांचे (६५) शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास हृयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शनिवारी दुपारी १ वाजता दादरच्या शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉ. अमोल कोल्हे, दिग्दर्शक कार्तिक केंढे, अभिनेत्री पल्लवी वैद्य, अभिनेत्री अश्विनी महागडे यांच्यासह अनेक कलाकारांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

बॉलीवूड तसेच मराठी टीव्ही मालिकांवरील ऐतिहासिक मालिकांच्या चित्रिकरणात त्यांचा मोठा वाटा होता. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राजा शिवछत्रपती, हिंदीत चित्तोड की राणी पद्मावती, शक्तीमान या मालिकांचेही त्यांनी चित्रीकरण केले होते.

- Advertisement -

निर्मल यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी स्वराजरक्षक संभाजी या मालिकेचे चित्रीकरण पूर्ण करुन ते घरी परतले होते. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -