घरमुंबईठाणेकरांनासुद्धा हवीय ५०० फुटापर्यंतच्या घरांना करमाफी

ठाणेकरांनासुद्धा हवीय ५०० फुटापर्यंतच्या घरांना करमाफी

Subscribe

मुंबई, नवी मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही ५०० फुटांच्या घरांवरील करात माफी देण्याची मागणी होत आहे.

मुंबईत ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच पावलावर पाऊल ठेवीत नवी मुंबईनेही हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेनेही हा निर्णय घ्यावा अशी मागणी ठाणेकरांकडून होत आहे. शुक्रवारच्या महासभेत राष्ट्रवादी कांग्रेसकडून लक्षवेधी मांडण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या महासभेकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.

करमाफी केल्यास कोट्यवधींचे उत्पन्न बुडणार

मुंबई महापालिका निवडणूकी वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५०० फुटांच्या घरांना करमाफीची घोषणा केली होती. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ही घोषणा करण्यात आली होती. मात्र मुंबईत निर्णय घेण्यात आला. ठाण्यातही शिवसेनेची सत्ता आहे. मग ठाणेकरांसाठी दुजाभाव का? असा सवाल उपस्थित होत आहे. ठामपा हद्दीतील ५०० चौ. फूटांचा मालमत्ता कर माफ केला तर ठामपाला किमान ६० ते ७० कोटींच्या उत्पन्नाचे नुकसान सोसावे लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – वाहतूक कोंडीमुळे कल्याण-डोंबिवलीत गुन्हेगारी वाढली

करमाफीसाठी महासभेत लक्षवेधी मांडणार

ठाणे शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून कोट्यवधी रुपयांचे नवनवीन प्रकल्प, योजना ठाणे महापालिका राबवित असते. त्यामुळे ६० ते ७० कोटी रुपयांची तूट अगदीच सामान्य आहे. अशा प्रकारे ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी दिल्यास ते ठाणेकरांच्या हिताचेच ठरेल, असे मत विरोधी पक्षनेता मिलिंद पाटील यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे, सन २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी शिवसेनेने ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे ठाण्यातील ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्यात यावी यासाठी राष्ट्रवादीकडून महासभेत लक्षवेधी मांडण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -