घरमुंबईठाणे जिल्ह्यातील शिक्षकांना १२ कोटी रुपयांची थकबाकी देण्याचे आदेश

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांना १२ कोटी रुपयांची थकबाकी देण्याचे आदेश

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकलेली १२ कोटी रुपयांची रक्कम देण्यास शिक्षण संचालनालायकडून मंजुरी देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शाळांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकलेली सुमारे १२ कोटी रुपयांच्या रक्कमेला शिक्षण संचालनालायकडून मंजुरी देण्यात आली आहे. तसेच थकीत वेतन अदा करण्याचे आदेश देखील देण्यात आले असल्याचे भाजपा प्रदेश शिक्षक आघाडीचे कोकण आणि मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले आहे.

शिक्षण संचालनालायकडून निधी वितरणाला मंजुरी

मुंबई विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी १४ फेब्रुवारी रोजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. तसेच निधी मंजूर होऊनही शिक्षण संचालनालयाकडून मंजुरी मिळत नसल्याने थकीत वेतन अदा करण्यात समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यावर शिक्षणमंत्र्यांनी त्वरित शिक्षण संचालकांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगितली आहे. त्याचप्रमाणे शिक्षण संचालकांनी १५ फेब्रुवारी रोजी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक, ठाणे जिल्हा वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालय आणि जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांना आदेश देऊन रक्कम प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

मुंबई विभागातील ठाणे जिल्ह्यात सुमारे २५० प्लॅन मधील प्राथमिक शाळा आणि वर्ग तुकड्या असून १ हजार ३५ शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी २०१७ या दोन महिन्याची नियमित वेतनाची रक्कम ७ कोटी ३० लाख ४६ हजार रुपये, तर वेतनाच्या टप्प्यातील फरकांची देयके ५ कोटी ३२ लाख १७ हजार तर वरिष्ठ वेतनश्रेणी फरक देयके रक्कम २४ लाख ८२ हजार अशी एकूण १२ कोटी ८७ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम शिक्षकांना देयक आहे

शिक्षणमंत्र्यांचे आभार

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांच्या थकीत वेतनाबाबत तातडीने कार्यवाही करा असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालकांना केल्याने शिक्षण संचालनालायकडून तातडीने दखल घेतली गेली. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांचे भाजपा शिक्षक आघाडीने आभार मानले असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बदला बोललात ना? मग आता घेऊन दाखवा

हेही वाचा – वरुण धवनलाही मराठी चित्रपटाची भुरळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -