घरमुंबईवज्रेश्वरी दरोडा प्रकरणी ५ जणांना अटक; पावणेतीन लाख जप्त

वज्रेश्वरी दरोडा प्रकरणी ५ जणांना अटक; पावणेतीन लाख जप्त

Subscribe

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात दरोडा टाकणाऱ्या 5 संशयितांना, ठाणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी 2लाख 83 हजार केले जप्त केले आहे. या मंदिरात शुक्रवारी (१० मे) पहाटेच्या सुमारास चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. मंदिरातील सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करून त्याचे हातपाय बांधून मंदिरातील पाच दानपेट्या फोडून त्यातील १० ते १२ लाखांची रोकड पोत्यांत भरून लुटून नेले होते. घटनेच्या निषेधार्थ स्थानिक ग्रामस्थांनी दिवसभर वज्रेश्वरी बाजारपेठ बंद ठेवून आपला संताप व्यक्त केला होता.

- Advertisement -

असा पडला दरोडा

भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध वज्रेश्वरी देवीचा दसरा उत्सव ८ ऑक्टोबर रोजी पार पडला. तर यावर्षीचा यात्रोत्सव ३ ते ५ मे २०१९ दरम्यान संपन्न झाला. या दोन्ही उत्सव काळात भाविकांनी देवीच्या मंदिरातील दानपेट्यांमध्ये भरभरून दान टाकले होते. तर काही परदेशी भाविकांनी डॉलरच्या रूपाने दान टाकले होते. याची माहिती दरोडेखोरांनी घेऊन पहाटेच्या सुमारास दरोडा टाकला होता. ५ दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश करून पहाऱ्यावर असलेला सुरक्षा रक्षक काथोड कोदे यास बेदम मारहाण करून त्याचे हातपाय रस्सीने बांधून ठेवले. त्यानंतर मंदिरातील दानपेट्या फोडून १० ते १२ लाख रुपयांची रोकड गोणीत भरून दरोडेखोर फरार झाले होते.

दरम्यान, सुरक्षारक्षकाने कशीबशी आपली सुटका करून मंदिराच्या पायथ्याशी धाव घेऊन पारंपारिक विश्वस्थ राज गोसावी यांना माहिती दिली. त्यांनी या घटनेची माहिती सकाळी गणेशपूरी पोलीस ठाण्यास देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मंदिराची पाहणी केली त्यानंतर सुरक्षारक्षकाच्या फिर्यादीवरुन अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. दरोड्याची घटना मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी पाच पथक तयार करत ती वेगवेगळ्या ठिकामी रवाना केली. अखेर तपासाला यश येऊन पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -