घरमुंबईVideo: ठाण्यात आरपीएफच्या जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण!

Video: ठाण्यात आरपीएफच्या जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण!

Subscribe

ठाण्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून आरपीएफच्या जवानाने प्रवाशाचा जीव वाचवला. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अनेक वेळा रेल्वे स्टेशनवर रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉनवर जाण्याबाबत सूचना दिल्या जातात. पण या सूचनेचं पालन काही प्रवाशी करत नसल्यामुळे अनेक अपघात घडतात. असा काहीशा अपघातामध्ये एका प्रवाशाच्या जीव रेल्वे पोलीसाने वाचवला आहे. मुंबईतील ठाणे रेल्वे स्थानकावर हा अपघात झाला असून याचा व्हिडिओ पाहून सर्वांच आश्चर्यचकित होईल. या सर्व घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पांढऱ्या रंगाचा प्रवाशी रेल्वे रूळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉमवर जाताना दिसत आहे. तो दुसऱ्या प्लॅटफॉमच्या इथे पोहचताच काही क्षणात ट्रेन आलेली दिसत आहे.

पण या प्रवाशाला वाचवण्यासाठी काही सेकंदाच आरपीएफ अधिकारी अनिल कुमार यांनी रेल्वे रूळावर उडी मारली. त्यानंतर अनिल कुमार यांनी या प्रवाशाला उचलून प्लॅटफॉमवर आणले आणि त्याचा जीव वाचवला. एएनआयने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

- Advertisement -

या घटनेचा व्हिडिओ पाहून ट्विटर युझरने आरपीएफ अनिल कुमार यांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. तर काही युझने ट्रॅक ओलांडल्यामुळे या प्रवाशाकडून दंड वसूल करण्याची मागणी केली आहे. पाहा काय म्हणाले ट्विटर युझर?…

- Advertisement -


हेही वाचा – ‘एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी करा’; आंबेडकर आणि गोऱ्हेंची मागणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -