घरमुंबईमुंबईत मांजाने चिरला पोलिसाचा गळा

मुंबईत मांजाने चिरला पोलिसाचा गळा

Subscribe

गवळी यांच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून १० टाके पडले आहेत.

मुंबईत पतंगाच्या मांजामुळे अपघात झाल्याचा घटना गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. त्यातच आता मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याचा मांजामध्ये अडकुन गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वरळी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्यरत असलेले राकेश गवळी बाईकवरुन जात असताना ही घटना घडली. पोलीस अधिकारी राकेश गवळी शनिवारी दुचाकीवरुन न्यायालयात जात असताना नॉयलॉनच्या मांजाने त्यांचा गळी चिरला. यावेळी राकेश यांना तत्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्याने ते थोडक्यात बचावले.

राकेश गवळी हे शनिवारी आपल्या दुचाकीवरून सत्र न्यायालयात जात होते. याचवेळी जे.जे.जंक्शनवर पोहताच अचानक पतंगीचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती अडकला आणि गळा चिरला गेला. याघटनेवेळी उपस्थित असलेले वाहतूक पोलीस हवालदार शिंदे गवळी यांच्या मदतीला धावत येत त्यांनी गवळी यांनी तत्काळ उपचारांसाठी जे.जे रुग्णालयत दाखल केले. याबाबतची माहिती समजात परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी गवळींवर तातडीने उपचार व्हावे यासाठी त्यांना वोकहार्ट रुग्णालयात दाखल करून घेतल. त्यानंतर गवळींवर तत्काळ शस्त्रक्रिया करुन त्यांच्या गळ्यावर १० टाके घालण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने गवळी यांचे प्राण थोडक्यात बचावले. या घटनेसंदर्भात गवळी हे एमआरए पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवणार आहेत. परंतु गवळी यांना काही दिवस बोलण्यास डॉक्टरांनी मनाई केली असून त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यात पतंगाच्या मांज्यामुळे घडणारे अपघात रोखण्यासाठी कडक नियमावली नियम घालण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -