घरमुंबईगुजरातमध्ये भाजपचा उमेदवारांसाठी करोडोंचा खर्च

गुजरातमध्ये भाजपचा उमेदवारांसाठी करोडोंचा खर्च

Subscribe

मुंबईत हार्दिक पटेलचा हल्लाबोल

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसने कंबर कसली असून रविवारी संध्याकाळी काँग्रेस उमेदवार संजय निरूपम यांनी अंधेरीमध्ये युथ काँग्रेसचे युवा संमेलन आयोजित केले होते. यावेळी अभिनेत्री आणि उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणार्‍या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर तसेच पाटीदार समाजाचा नेता आणि काही दिवसांपूर्वी काँग्रेसवासी झालेल्या हार्दिक पटेलची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी हार्दिक पटेलने सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. अहमदाबादमधून मुंबईला येत होतो तेव्हा अनेक व्यापार्‍यांशी बोलणे झाले. भाजपला मत न देता गपचूप लोक काँग्रेसला मत देतील,असे व्यापारी म्हणत असल्याचे हार्दिकने सांगितले.तर गुजरातमध्ये एका एका जागेसाठी 20 ते 25 करोड खर्च भाजप करत असल्याचा आरोप हार्दिकने केला आहे. पाच वर्षांनंतर जेव्हा जाहीरनामा घेऊन जायची वेळ आली तेव्हा भाजपवाले लोकांच्या भावना भडकवत आहेत, फेसबुक आणि ट्विटरवर भाजपच्या विरोधात बोलत आहेत जे बोलत त्यांच्यावर आरोप होत आहेत,असेही हार्दिक म्हणाला. तर उर्मिला मातोंडकर यांनी सुद्धा भाजपवर हल्लाबोल केला. रडून रडून राजकारण करणार्‍या पक्षात मी नाही. त्यामुळे माझ्यावर कितीही टीका झाली तरी मी रडणार नाही, आपल्या ताकदीवर मी लढणार यासाठी मला तुमची साथ हवी, मी अजून नेता बनली नाही. मी चित्रपट क्षेत्रातील आहे म्हणून मला अक्कल नाही, असे देखील काही जण म्हणतात. परंतु, मी आज फक्त विकासाबद्दल बोलेन साध्य सरळ मध्यम वर्गातून एखादी मुलगी या जागेवर पोहोचते तेव्हा तिला आजही उलट सुलट प्रश्न विचारले जातात,असेही उर्मिला म्हणाली.

निरुपमांच्या कार्यक्रमातून देवरा गायब

मुंबईत काँग्रेसचा कार्यक्रम आयोजित असताना या कार्यक्रमाच्या पोस्टरवरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे फोटोच गायब होते. तसेच काँग्रेसच्या राज्यातील कोणत्याही नेत्याचे फोटो या पोस्टरवर नव्हते. त्यामुळे मुंबई काँग्रेसमधली गटबाजी अद्याप संपली नसल्याचीच चर्चा कार्यक्रम स्थळी होत होती.
शनिवारी अहमदनगरमध्ये झालेल्या प्रचारादरम्यान विखे पाटील आणि थोरात यांच्या गटांमध्ये मतैक्य नसल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसच्या प्रचार पोस्टर्सवरून राधाकृष्ण विखे पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -