डोंगरीत घराचा स्लॅब कोसळला; एकाचा मृत्यू तर एक जखमी

Mumbai
dongari
डोंगरीत स्लॅब कोसळला

डोंगरी परिसरात घराचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मुंबईतील डोंगरी परिसरातील चिंचबंदर लेनवरील एका घरातील स्लॅब कोसळला असून आज, सोमवारी सकाळी १०.३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे. यामध्ये मृत झालेल्या व्यक्तीची ओळक पटली नसून जखमी झालेल्याचे नाव शाबिर शेख (वय २२) हे आहे. त्यांच्यावर जे. जे. हॉस्पिटलमधील १४ नंबर वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच, या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे जे. जे. हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम यांनी दिली आहे.