घरमुंबईनाशिक ग्रामदेवतेची परंपरा १०२ वर्षांनी खंडित

नाशिक ग्रामदेवतेची परंपरा १०२ वर्षांनी खंडित

Subscribe

यावर्षी भाविकांना प्रथमच प्रत्यक्ष देवीच्या दर्शनाचा लाभ होणार नाही .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संस्थानने ऑनलाइन स्वरूपात दर्शन देणार असल्याने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ,पण दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही पालकमंत्री ,महापौर ,उपमहापौर तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या नियमाचे पालन करून पूजा- अर्चन आरती ,मंदिरात अष्टमी ला होमहवन ,रोज आरती ,तसेच काकड आरती होणार असल्याचे यावेळी संस्थानचे विश्वस्त केशव अण्णा पाटील यांनी यावेळी सांगितले.

चैत्राली अढांगळे,नाशिक.
अतिप्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करत आला आहे. दृश्य सृष्टीतील शक्तीचे रहस्य मानवाला आकलन झाले नाही. या शक्तीभोवती त्याने देवत्वाची वलये गुंफली व दैवची स्वरूपांत तिची उपासना करू लागला. विश्वातील सर्जनामागे बीज क्षेत्र न्यायाने कोणीतरी जन्मदात्री शक्ती असलीच पाहिजे, असे मानवाला वाटले. मग त्यातूनच शक्तीची उपासना सुरू झाली. शनिवार(दिनांक१७) पासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे.
नाशिकची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या जुन्या आग्रारोड नजीक असलेले ४३ वर्षांपूर्वी कात टाकून नव्या रुपात पदार्पण केलेले कालिकेचे मंदिर म्हणजे नाशिकच्या वैभवातील एक मानाचे पान आहे. नवरात्रीच्या दिवसांत नाशिकचे सर्व रस्ते कालिकेच्या मंदिराकडेच जातात, असे म्हणतात. या जागृत देवस्थानाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इ. स. १७०५ च्या सुमारास केला. त्यांनी बांधलेले दगडी मंदिर दहा बाय दहा फूट लांबीचे व पंधरा फूट उंचीचे होते. त्या जवळच एक बारव होती,असा मंदिराचा इतिहास आहे.
गाभाऱ्यात उंच ओट्यावर महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांच्या मूर्ती आहेत. पूर्वी या ठिकाणी फक्त कालिकेची शेंदूरचर्चित मूर्ती होती पण तिचे कवच काढून हल्लीची नयनमनोहर मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. येथे श्रीकालिका माता कुमारिकेच्या स्वरूपांत आहे. तिचे स्वरूप चंडिकेसारखे उग्र नसून एखाद्या लहान बाल‌िकेसारखे अतिशय लोभस आणि सात्विक आहे. देवीच्या मागे नऊ फण्यांचा शेषनाग दिसतो आहे. तिच्या पायाखाली तीन राक्षसांची मुंडकी आहेत. त्यावर कालिकादेवी उभी आहे. तिच्या उजव्या बाजूंच्या हातांत त्रिशूल व तलवार तर डाव्या बाजूंच्या हातांत डमरू व खडग आहे. तसेच कमंडलू सारखे भांडे देखील आहे.
जनतेचे सहकार्य व मदत घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वसंतराव गुप्ते यांनी २० डिसेंबर १९७४ रोजी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन केले. त्यानंतर बरोबर सहा वर्षांनी १९८० साली हल्ली आग्रारोडवर दिमाखात उभे असलेले श्रीकालिका देवीचे कलाकुसरीने नटलेले विशाल मंदिर व सभामंडप तयार झाले. या मंदिराचा गाभारा अठरा बाय अठरा फुटांचा तर शिखर ३० फूट उंच आहे. गाभाऱ्यापुढचा सभामंडप ४० बाय ६० फूट एवढा मोठा आहे. आता तर मंदिराला दोन्ही बाजूंना प्रवेशदारे आहेत .नवरात्रात आणि वर्षभर मंदिर परिसरावर क्लोजसर्किट टीव्हीद्वारे नियंत्रण ठेवले जाते.
पण यावर्षी भाविकांना प्रथमच प्रत्यक्ष देवीच्या दर्शनाचा लाभ होणार नाही .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संस्थानने ऑनलाइन स्वरूपात दर्शन देणार असल्याने गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ,पण दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही पालकमंत्री ,महापौर ,उपमहापौर तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या नियमाचे पालन करून पूजा- अर्चन आरती ,मंदिरात अष्टमी ला होमहवन ,रोज आरती ,तसेच काकड आरती होणार असल्याचे यावेळी संस्थानचे विश्वस्त केशव अण्णा पाटील यांनी यावेळी सांगितले.
_______
कोरोनामुळे यावर्षी भाविकांना मंदिरात प्रवेश नसल्याने मंदिराच्या विश्वस्तांनी संपूर्ण मंदिरात स्क्रीनच्या आधारे तसेच ,युट्यूब ,फेसबुक माध्यामातून थेट प्रक्षेपण व ऑनलाइन पद्धतीने बँक खाते सुरू करून दानाची व्यवस्था केली आहे.
केशव अण्णा पाटील
विश्वस्त कालिका मंदिर देवस्थान नाशिक.
______
नवरात्रीत नऊ दिवस रोज देवीचे अलंकार , देवीचा साज तसेच वस्त्रालंकार करण्यात येणार असून पहाटे ४ वाजता आरती करून सकाळी ७ वाजता देवस्थानचे विश्वस्त ,सदस्यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे.
त्याचप्रमाणे दुपारी १२.३० वाजता नैवैद्य अर्पण करून संध्याकाळी ७वाजता आरती करून ललीतपंचमी ,सहस्रनामावली ,कुंकुमार्जन करण्यात येणार आहे.

किरण पुराणिक (देवस्थान पुजारी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -