घरमुंबईअंबरनाथ स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी विशाल ठोंबरे

अंबरनाथ स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी विशाल ठोंबरे

Subscribe

रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी विशाल ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे.

रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटीच्या अध्यक्षपदी विशाल ठोंबरे यांची निवड करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर दुष्काळाच्या चक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी रेन वॉटर हार्वेस्टिंग क्षेत्रात भरीव कामगिरी करणार असल्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्ष विशाल ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ स्मार्ट सिटी तृतीय वर्षात पदार्पण करताना रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे नियोजित अध्यक्ष डॉ. मयुरेश वारके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मावळते अध्यक्ष दिलीप कोठावदे यांच्याकडून विशाल ठोंबरे यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे स्विकारली आहेत. यावेळी सहाय्यक गव्हर्नर अनिल सहजवला, ग्रुप कोर्डीनेटर राजेंद्र पाटील, सेक्रेटरी गोकुळ पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

क्लबच्या नावाजलेल्या प्रकल्पांपैकी, अंगणवाडी सबलीकरण, नवदुर्गा पुरस्कार, नवरंग चित्रकला स्पर्धा यांनाही नवीन जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही विशाल ठोंबरे यांनी सांगितले आहे. मावळते अध्यक्ष दिलीप कोठावदे यांनी गतवर्षी क्लबने केलेल्या भरीव कार्याचा अहवाल सादर केला. तसेच येणाऱ्या वर्षासाठी अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. मयुरेश वारके यांनी रोटरीची वाटचाल याची माहिती दिली आहे. तसेच केवळ दोन वर्ष जुन्या क्लबने केलेल्या भरीव कामाची प्रशंसा केली आहे. देवराम गागरे, सर्जेराव सावंत, विजयन नायर, एड. स्वप्नील वर्मा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

अध्यक्षपदी विशाल ठोंबरे, सचिवपदी गोकुल पाटील, खजिनदारपदी सी. . पांडुरंग पांढरे, संचालकपदी रेखा चौहान, डॉ. जयेश वराडे, सुशांत कोठावदे, दिलीप कोठावदेशीतल जोशी, राकेश देगावकर, सरीता चौधरी, मधु यादव, संगीता राजपाल, जयश्री मोरे, मधु मेनन, अनिल दशपुते, बाबासाहेब गिड्डे, डॉ. अविनाश नारायणकर, प्रकाश डावरे, संदीप पाटकर, प्रथमेश येवले, सारिका गागरे, अंकिता भागवत, शैलेंद्र वडपकर, नवनाथ शेळके हे असणार आहेत. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -