घरमुंबईपश्चिम रेल्वेवर लवकरच सेमी एसी लोकल धावणार

पश्चिम रेल्वेवर लवकरच सेमी एसी लोकल धावणार

Subscribe

उपनगरी लोकलमधील प्रथम श्रेणीच्या डब्यांना एसीमध्ये रूपांतरित करून एसी लोकल चालवण्याच्या प्रस्ताव पश्चिम रेल्वेने तयार केला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गवरील एसी लोकलचा वाढता प्रतिसाद बघून पश्चिम रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी पुन्हा एक नवीन युक्ती लढवत आहे. उपनगरी लोकलमधील प्रथम श्रेणीच्या डब्यांना एसीमध्ये रूपांतरित करून एसी लोकल चालवण्याच्या प्रस्ताव पश्चिम रेल्वेने तयार केला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना लवकरच सेमी एसी लोकलने प्रवास करता येणार आहे. मात्र त्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सेमी एसी लोकल लवकरच

पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल डिसेंबर २०१७ मध्ये धावली. एसी लोकलचा वाढता प्रतिसाद बघून रेल्वेकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आणखी एसी लोकल आणण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे बोर्डाने काही महिन्यांपूर्वीच आणखी १२ वातानुकूलित लोकल गाड्यांच्या प्रकल्पाला पश्चिम आणि मध्य रेल्वेवर दाखल करण्यास मंजुरी दिली आहे. मात्र आता संपूर्ण एसी लोकल चालवण्यापेक्षा सेमी एसी लोकल चालवण्याचा पर्याय रेल्वेकडून तपासला जात आहे. तसा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने नुकताच तयार केलेला आहे. यापूर्वी सेमी एसी लोकलची संकल्पना २०१८ मध्ये रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सर्व प्रथन मांडली होती.

- Advertisement -

सेमी एसी लोकलवर चर्चा सुरु

दरम्यान, ७० लोकलचे रुपांतर सेमी एसी लोकलमध्ये करण्यात येणार होते. मात्र या संकल्पना रेल्वेच्या रिसर्च डिझाईन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) सेमी लोकलच्या रचनेला परवानगी दिली नव्हती. त्यामुळे या संकल्पनेवर विचार सुद्धा झाला नाही. मात्र आता पुन्हा एकादा नव्याने सेमी लोकलची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी पश्चिम रेल्वेने सेमी लोकलचा प्रस्ताव सुद्धा तयार केला आहे. या प्रस्तावर रेल्वे बोर्डाचे वाहतूक सदस्य गिरीश पिल्लई यांच्यासोबत चर्चा सुद्धा झालेली आहे.

अशी असणार सेमी एसी लोकल

पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या एक एसी लोकल चालवण्यात येत आहे. या लोकलच्या दिवसभरात १२ फेऱ्या होतात. त्यासाठी सामान्य लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यामुळे आता संपूर्ण एसी लोकल चालविण्यापेक्षा सेमी लोकल चालविण्याची मागणी सुद्धा प्रवाशांनी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या सेमी एसी लोकलसाठी सध्याच्या १२ डब्याच्या लोकलमधील प्रथम श्रेणीचे ३ डबे वातानुकूलित करण्यात येणार असून, उर्वरित ९ डबे सामान्य असणार आहेत. तर १५ डब्याच्या लोकलमध्ये ६ डबे वातानूकुलीत तर उर्वरित ९ डबे साधे असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

मुंबईकरांसाठी खुशखबर; आणखी १२ एसी लोकल येणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -