घरक्रीडाना प्रेक्षक, ना सेलिब्रेशन.. कोरोनाच्या दहशतीखाली अखेर क्रिकेट सुरू!

ना प्रेक्षक, ना सेलिब्रेशन.. कोरोनाच्या दहशतीखाली अखेर क्रिकेट सुरू!

Subscribe

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे गेल्या ३ महिन्यांपासून जास्त काळ बंद असलेलं क्रिकेट आता पुन्हा सुरू झालं आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ टेस्ट मॅचची सीरिज आजपासून सुरू झाली आहे. याआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर शेवटचा क्रिकेट सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात १३ मार्चला खेळला गेला होता. मधल्या काळात कोरोनानं जगभरात थैमान घातल्यानंतर अखेर शक्य ती सर्व काळजी घेऊन नव्या नियमांसोबत पुन्हा एकदा खेळाडू मैदानावर उतरले आहेत. कोरोनाची दहशत असून देखील वेस्ट इंडिजचे खेळाडू टेस्ट सीरीजसाठी इंग्लंडमध्ये आले आहेत. या सीरीजसाठी खेळाच्या एकूण १० बाबीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

१. खचाखच भरलेल्या स्टेडियमला खेळाडू मुकणार आहेत. या सीरीजमध्ये एकही प्रेक्षक स्डेडियममध्ये नसेल. सर्वजण घरूनच मॅच पाहू शकणार आहेत.

- Advertisement -

२. मैदानाच्या सीमारेषेबाहेर ठिकठिकाणी सॅनिटायझर स्टॅण्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे वेळोवेळी खेळाडू हातांना सॅनिटायझर लावू शकणार आहेत.

३. सामान्य परिस्थितीत विकेट घेतल्यानंतर बॉलिंग टीम एकमेकांना टाळ्या देऊन आणि गळाभेट घेऊन जोशात सेलिब्रेशन करते. पण आता मात्र टाळ्या किंवा गळाभेट घेण्यावर मनाई केली आहे. खेळाडू फारतर हाताचे कोपर एकमेकांना लावून सेलिब्रेट करू शकतील.

- Advertisement -

४. स्टेडियममध्ये एकही प्रेक्षक नसताना खेळाडूंना खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून मोठ्या स्पीकरवर प्रेक्षकांचे फक्त आवाज चालवले जाणार आहेत. शिवाय मैदानावर लाईव्ह व्यूसाठी मोठ्या स्क्रीन्स देखील लावल्या जाणार आहेत.

५. बॉलिंग करणारा खेळाडू स्विंग मिळवण्यासाठी बॉलची एक बाजू तोंडातली थुंकी लावून चमकवताना अनेकदा आपण पाहिलं आहे. पण आता थुंकी लावायला बंदी घातली आहे. बॉल चमकवण्यासाठी खेळाडू घामाचा वापर करू शकतात. थुंकी लावताना खेळाडू आढळल्यास आधी वॉर्निंग आणि नंतर थेट आर्थिक दंड करण्यात येईल.

६. जर कोणत्या खेळाडूला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली, तर त्याच्या जागी दुसरा खेळाडू तो संपूर्ण सामना खेळू शकतो.

७. स्टेडियममध्ये एकही प्रेक्षक नसल्यामुळे मैदानावर लावण्यात आलेल्या माईकमधून खेळाडू बोलत असलेलं सारंकाही स्पष्ट ऐकू जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी खेळताना काहीही आक्षेपार्ह बोलू नये, अशी तंबी आयसीसीनं देऊन ठेवली आहे.

८. खेळाडूंना मॅचदरम्यान फक्त हॉटेलमधून मैदान आणि मैदानातून हॉटेल असाच प्रवास करता येईल.

९. इतर वेळी आंतरराष्ट्री सामन्यांमध्ये दुसऱ्या देशांमधून अंपायर्सला बोलावलं जातं. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहाता स्थानिक अंपायर्स अंपायरिंग करताना दिसणार आहेत.

१०. टेस्ट मॅचच्या जर्सीवर मागच्या बाजूला फक्त खेळाडूचं नाव असतं. त्याव्यतिरिक्त इतर काहीही जर्सीवर दिसत नाही. पण कोरोनामुळे क्रिकेट बंद असल्याने झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी पुढच्या वर्षभरात जेवढ्या टेस्ट मॅच होतील, त्यात खेळाडूंच्या जर्सीच्या पुढच्या भागात स्पॉन्सर्सचे लोगो लावण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -