घरक्रीडाप्रीमियर लीग : लिव्हरपूलने उडवला लेस्टरचा धुव्वा

प्रीमियर लीग : लिव्हरपूलने उडवला लेस्टरचा धुव्वा

Subscribe

ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्डच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात लेस्टर सिटीचा ४-० असा धुव्वा उडवला. या विजयामुळे प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी असणार्‍या लिव्हरपूलने आपले स्थान अधिकच भक्कम केले आहे. हा लिव्हरपूलचा १८ सामन्यांतील १७ वा विजय होता. त्यामुळे त्यांचे ५२ गुण झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यात आणि दुसर्‍या स्थानी असणार्‍या लेस्टरमध्ये (३९ गुण) आता तब्बल १३ गुणांचा फरक आहे.

या सामन्यात लिव्हरपूलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्यामुळे त्यांना पहिल्या अर्ध्या तासातच गोल करण्याच्या बर्‍याच संधी मिळाल्या, पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. मात्र, ३१ व्या मिनिटाला ट्रेंट अलेक्झांडर-अर्नोल्डच्या क्रॉसवर रॉबर्टो फार्मिंहोने हेडर मारत गोल केला आणि लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत राखली. उत्तरार्धात लेस्टरचे खेळाडू आपला खेळ सुधारतील अशी अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही.

- Advertisement -

लिव्हरपूलने मात्र आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला. या सामन्याच्या ७० व्या मिनिटाला लिव्हरपूलला पेनल्टी मिळाली, ज्याचे जेम्स मिलनरने गोलमध्ये रूपांतर करत आपल्या संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. काही मिनिटानंतरच अलेक्झांडर-अर्नोल्डच्याच पासवर फर्मिंनोने आपला दुसरा आणि लिव्हरपूलचा तिसरा गोल केला. तर ७८ व्या मिनिटाला अलेक्झांडर-अर्नोल्ड केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने हा सामना ४-० असा जिंकला.

दुसरीकडे मँचेस्टर युनायटेडने न्यूकॅसल युनायटेडचा ४-१ असा पराभव केला. मँचेस्टर युनायटेडकडून या सामन्यात अँथनी मार्शियालने दोन, तर मेसन ग्रीनवूड आणि मार्कस रॅशफोर्ड यांनी प्रत्येकी एक गोल केला. आर्सनल आणि बॉर्नमथ यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत राहिला. नवे प्रशिक्षक मिकेल आर्टेटा यांच्या मार्गदर्शनात खेळण्याची आर्सनलची ही पहिलीच वेळ होती. एव्हर्टनने बर्नली संघाला १-० असे पराभूत करत यंदाच्या मोसमातील आपला सहावा विजय मिळवला.

- Advertisement -

चेल्सीला पराभवाचा धक्का

साऊथहॅम्पटनने प्रीमियर लीगच्या सामन्यात चेल्सीला २-० असा पराभवाचा धक्का दिला. मागील सामन्यात चेल्सीने पारंपरिक प्रतिस्पर्धी टॉटनहॅमवर मात केली होती. परंतु, त्यांना कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. साऊथहॅम्पटनविरुद्ध त्यांना गोल करण्याच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. तर ओबाफेमी (३१ वे मिनिट) आणि नेथन रेडमंड (७३ वे मिनिट) यांनी गोल करत साऊथहॅम्पटनला हा सामना जिंकवून दिला. हा चेल्सीचा १९ सामन्यांतील सातवा पराभव ठरला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -