इटालियन ओपन टेनिस स्पर्धा

Mumbai
’कॅरोलिना प्लिस्कोवा’ला जेतेपद

चेक प्रजासत्ताकाच्या चौथ्या सीडेड कॅरोलिना प्लिस्कोवाने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तिने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्रिटनच्या जोआना कोंटाचा ६-३, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. २०१७ फ्रेंच ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार्‍या प्लिस्कोवाचे हे कारकिर्दीतील १३वे जेतेपद होते.

या स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडू नाओमी ओसाका (दुखापत), पेट्रा क्विटोव्हा (दुखापत), सिमोन हालेप (पहिल्या फेरीत पराभूत) या लवकर स्पर्धेबाहेर झाल्यामुळे प्लिस्कोवालाच ही स्पर्धा जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात होते आणि तिने अप्रतिम खेळ करत जेतेपद पटकावलेच.

या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्लिस्कोवाने चांगला खेळ केला. तिने कोंटाची पहिलीच सर्व्हिस मोडत ३-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतरही तिने चांगला खेळ सुरु ठेवत पहिला सेट ६-३ असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये ३-३ अशी बरोबरी असताना प्लिस्कोवाने कोंटाची सर्व्हिस मोडत आणि आपली सर्व्हिस राखत ५-३ अशी आघाडी मिळवली. यानंतर तिने आपली सर्व्हिस राखत हा सेट ६-४ असा जिंकत हा सामनाही जिंकला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here