जेटलींना दिल्लीत सचिन तेंडुलकर घडवायचा होता

Mumbai

केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वावर देखील शोककळा पसरली आहे.भारताच्या कर्णधार कोहलीसह अनेक खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. अरुण जेटली हे फक्त चांगले राजकारणी होते, असे नाही. कारण त्यांना क्रिकेटमध्येही रस होता. त्यामुळेच ते दिल्लीच्या क्रिकेट मंडळामध्येही होते. जेटली यांना भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटपटब दिल्लीमधून घडवायचा होता. सचिनला आव्हान देईल असा फलंदाज आमच्या दिल्लीत तयार होत आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवा असे जेटलींनी सांगितले होते. विरेंद्र सेहवाग या त्यावेळच्या उदयोन्मुख खेळाडूकडे त्यांचा कटाक्ष होता. सचिनची जागा तो घेईल असे त्यांना वाटत होते. विरेंद्र सेहवागच्या फलंदाजीने भारतीय क्रिकेटवर ठसा उमटविला. त्याबरोबर सेहवाग सचिनच्या खांद्याला खांदा लावून सलामीला उतरायचा.

जेटलींकडून सेहवागची मनधरणी

दिल्लीच्या क्रिकेट मंडळात काम करताना त्यांनी बर्‍याच खेळाडूंच्या कारकिर्दीला आयाम दिला होता. याचाच एक भाग म्हणून जेटली यांनी सेहवागची मनधरणी केल्यामुळेच तो क्रिकेट खेळायला लागला होता. वीरेंद्र सेहवाग हा दिल्लीकडून क्रिकेट खेळत होता. पण अंतर्गत राजकारणाचा त्याला फटका बसत होता. त्यामुळे त्याने दिल्लीच्या संघाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. जेटलींना जेव्हा समजले की सेहवाग दिल्लीचा संघ सोडून हरयाणाला खेळायला जाणार आहे आणि त्याची प्रक्रीया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यावेळी जेटली यांनी स्वत:हून सेहवागशी संपर्क साधला. सेहवागची मनधरणी करण्यात जेटली यशस्वी झाले होते. जेटली यांच्यामुळेच सेहवागने दिल्ली सोडून हरयाणामधून खेळण्याचा निर्णय बदलला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here