घरक्रीडा#ShameOnGautamGambhir: जिलेबी खाणं पडलं गंभीरला महागात

#ShameOnGautamGambhir: जिलेबी खाणं पडलं गंभीरला महागात

Subscribe

पूर्व दिल्लीचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गौतम गंभीर सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दिल्लीतील प्रदूषणाविषयी संसदीय समितीची बैठक होती. मात्र त्या बैठकीला गौतम गंभीरला उपस्थित लावली नसल्यामुळे नेटकरी त्यांना खूप ट्रोल करत आहे. देशभरातील जनता #ShameOnGautamGambhir या हॅशटॅगवर ट्विट करताना दिसत आहेत. वास्तविका शुक्रवारी प्रदूषणासंदर्भात शहरविकास मंत्रालयशी संबंधित संसदीय स्थायी समितीची बैठक झाली. गृहनिर्माण आणि शहर कामकाजाचे प्रतिधिनी, डीडीए, एनडीएमसी, सीपीडब्ल्यूडी, एनबीसीसी आणि दिल्ली महानगरपालिकेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार होते. परंतु ही बैठक तहकूब करावी लागली.

दिल्ली महानगरपालिकेचे तीन आयुक्त, डीडीएचे उपाध्यक्ष, पर्यावरण मंत्रालयाचे सचिव आणि सह-सचिव हे उपस्थित नसल्याने बैठक तहकूब करण्यात आली. या उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांच्या वृत्तीची समितीने गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत फक्त गंभीर नाही तर राज्यसभेचे खासदार एम जे अकबर आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांच्यासह सर्व लोक बैठकीत उपस्थित नव्हते.

- Advertisement -

आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे ट्विट रिट्विट करून असा प्रश्न उपस्थित केला आहे की, प्रदूषण संसदीय समितीच्या महत्त्वपूर्ण बैठक सोडून जिलेबी खाताना दिसत आहे हेच का दिल्लीचे खासदार?

- Advertisement -

गौतम गंभीरला या प्रकरणावरुन सोशल मीडियावरील टीकेला सामोरे जावं लागतं आहे. कुठल्या गोष्टीला त्याने प्राधान्य द्यावं यावरुन त्यांना झापलं जात आहे. दिल्लीमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षानेही त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पाहा काय म्हणाले नेटकरी?


हेही वाचा – पोलिसांच्या कुत्र्याला उत्तर देण्यासाठी आंदोलकांनी रस्त्यावर आणला सिंह!


 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -