सँडविच खात होतो, तितक्यात धोनीने पॅड घालायला सांगितले!

 रैनाने सांगितला किस्सा

Mumbai

भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आता केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. एकदिवसीय विश्वचषकात हे दोन संघ आतापर्यंत सात वेळा आमनेसामने आले आहेत आणि सातही वेळा भारताने बाजी मारली आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये २०१५ साली झालेल्या विश्वचषकातही या दोन संघांमधील सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा भारतीय संघ विजयी ठरला होता. या सामन्यातील एक किस्सा सुरेश रैनाने सांगितला.

२०१५ विश्वचषकात अजिंक्य रहाणे चौथ्या आणि मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करायचो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शिखर धवन आणि विराट कोहली चांगली फलंदाजी करत होते. मी सँडविच खात त्यांची फलंदाजी पाहत बसलो होतो. तितक्यात धोनीने मला पॅड घालण्यास सांगितले. मी त्याच्या निर्णयावर कधीच प्रश्न विचारले नाहीत. मी हातातले सँडविच बाजूला ठेवून पॅड घातले. त्यानंतर धवन धावचीत झाला आणि मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला गेलो. मी काही चांगले फटके मारत ७०-८० धावा केल्या, असे रैनाने सांगितले. रैनाने त्या सामन्यात ५६ चेंडूत ७४ धावा फटकावल्या होत्या. भारताने हा सामना ७६ धावांनी जिंकला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here