घरक्रीडासुहास जोशी, विनायक राणे यांना क्रीडा पत्रकारिता पुरस्कार

सुहास जोशी, विनायक राणे यांना क्रीडा पत्रकारिता पुरस्कार

Subscribe

मुंबई मराठी पत्रकार संघाचे क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून दै. नवाकाळचे सुहास जोशी यांची महेश बोभाटे क्रीडा पत्रकारिता पुरस्कार आणि आत्माराम मोरे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणार्‍या युवा क्रीडा पत्रकार पुरस्कारासाठी महाराष्ट्र टाइम्सचे विनायक राणे यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी मंगळवारी हे पुरस्कार जाहीर केले.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुहास जोशी यांनी १९८५ साली सांज तरुण भारतपासून आपल्या क्रीडा पत्रकारितेतील कारकिर्दीला सुरुवात केली. मागील ३५ वर्षांत त्यांनी सांज तरुण भारत, मुंबई तरुण भारत आणि दै.नवाकाळ या दैनिकांत क्रीडा पत्रकारिता केली. नवोदित पत्रकारांसाठी जोशी नेहमीच मार्गदर्शक ठरले आहेत. त्यांनी आपल्या लेखांच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना, संघटकांना न्याय मिळवून दिला आहे. आजवर दैनिकांसह अनेक साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके आणि दिवाळी अंकांमध्ये त्यांचे पाच हजारांपेक्षा अधिक लेख आणि मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी बर्‍याच क्रीडाविषयक कार्यक्रमांचे सादरीकरणही केले आहे. या त्यांच्या योगदानामुळे युआरएल, राज्य कबड्डी, श्री समर्थ व्यायाम मंदिर, राज्य कॅरम, उपनगर कबड्डी, विचारे प्रतिष्ठान या नामांकित संस्था-संघटनांनी त्यांना क्रीडा पत्रकारिता पुरस्कार दिले आहेत.

- Advertisement -

दीड दशकांच्या कारकीर्दीत धडाडीची क्रीडा पत्रकारिता करणार्‍या विनायक राणे यांची आत्माराम मोरे क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. विनायक मोरे यांनी २००३ साली युवा सकाळमधून क्रीडा पत्रकारितेतील कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी मागील १२ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातून प्रो-कबड्डी, चेन्नई ओपन, हॉकी विश्वचषक, युवा फिफा विश्वचषकासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे वार्तांकन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -