घरफिचर्सप्रतिसाद

प्रतिसाद

Subscribe

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करा
महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी करणे, गटारे स्वच्छ करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सभोवतालचा परिसर स्वच्छ करणे इ. कामांना प्राधान्य दिले पाहिजे. कंत्राटदारांकडून हेळसांड होत असेल तर प्रशासनाने दोषींना समज देण्याऐवजी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याचप्रमाणे भविष्यात याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.
दादासाहेब येंधे, काळाचौकी, मुंबई

कायदेशीर पावले उचला                                                                                                  ‘महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता आणि तो हिंदू होता’ असं विधान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मियाम या पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी केले आहे. एका विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे विधान केले. निवडणुकांत अशाप्रकारची विधाने करून विशिष्ट मतदारांवर आपली छाप पाडण्याचा आटापिटा करणार्‍या नेत्यांना चाप लावण्यासाठी निवडणूक आयोग स्वतःहून ठोस कारवाई करणार आहे का? प्रसारमाध्यमांतून असे विधान केल्याचे नागरिकांना समजते. हाच मुद्दा निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला नसेल का ? निवडणुकीसारख्या संवेदनशील काळात अशा विधानांमुळे सामाजिक शांततेचा भंग होऊन विपरित घटना घडल्यास त्याचे दायित्व कमल हसन यांचेच असेल. नेते भडकाऊ विधाने करत असतात आणि त्याचे पडसाद समाजात उमटल्यावर त्याचा त्रास समाजालाच भोगावा लागतो. त्यासाठी आता जनतेनेही पुढाकार घेऊन भडकाऊ विधाने करणार्‍यांना रोखण्यासाठी कायदेशीर पावले उचलणे गरजेचे आहे.
राहुल लोखंडे, नवी मुंबई

- Advertisement -

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे अभिनंदन
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंगवर सामन्यातील शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. अतिशय अटीतटीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात कोण विजयी होणार याची शिगेला पोहोचलेली उत्सुकता शेवटच्या चेंडूवर संपली. संपूर्ण सामन्यात विजयाचे पारडे सतत फिरत होते. त्यामुळे कोण जिंकेल हे कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नव्हते. ज्या लसीत मलिंगाने अगोदरच्या ओव्हरमध्ये २० धावा दिल्या होत्या. त्याच मलिंगाने शेवटच्या षटकात ९ धावांचा यशस्वी बचाव केला. शेवटी एक चेंडू आणि दोन धावा असे समीकरण असताना, अनुभवी लसीत मलिंगाने शार्दूल ठाकूरला पायचीत केले आणि विजयाची माळ मुंबई इंडियन्सच्या गळ्यात पडली. मुंबई इंडियन्सने या विजेतेपदासोबत सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला, तर चेन्नई सुपर किंग कमनशिबी ठरल्याने चेन्नई सुपर किंगला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दोन तुल्यबळ संघातील ही अंतिम लढत डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली. धोनीच्या चेन्नई सुपर किंगमध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा तर मुंबई इंडियन्समध्ये तरुण व अनुभवी खेळाडूंचे मिश्रण होते. आयपीएलच्या या बाराव्या हंगामाचे विजेतेपद पटकावित मुंबई इंडियन्सने आपणच आयपीएलचे किंग आहोत. हे सिद्ध केले. आयपील जिंकणार्‍या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचे मनापासून अभिनंदन !
श्याम बसप्पा,पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -