घरक्रीडाविराट क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक - सचिन तेंडुलकर

विराट क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक – सचिन तेंडुलकर

Subscribe

विराटच्या कधीही न संपणाऱ्या धावांच्या भुकेमुळे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून संबोधले आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली हा जागतिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. तो जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा नवनवे विक्रम करत असतो. त्याने नुकताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम केला. त्याच्या या कधीही न संपणाऱ्या धावांच्या भुकेमुळे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने विराटला क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून संबोधले आहे.

सुरुवातीपासूनच त्याच्यात काहीतरी खास दिसले

सचिन विराटविषयी म्हणाला, “विराटने आपल्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. त्याने सुरुवातीपासून आतापर्यंत खूपच प्रगती केली आहे. मला सुरुवातीपासूनच त्याच्यात काहीतरी खास आहे हे कळले होते. मला नेहमीच वाटायचे की तो जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होईल. पण तो क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक झाला आहे.”

खेळाडूंमध्ये तुलना आवडत नाही

कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा पार करताना सचिनलाच मागे टाकले होते. सचिन आणि कोहली यांच्यात नेहमीच तुलना होत असते. दोन खेळाडूंमधील तुलनांबाबत सचिन म्हणाला, “माझा तुलनांवर विश्वास नाही. प्रत्येक फलंदाज ज्या परिस्थितीत, ज्या वेळी खेळतो ते वेगवेगळे असते. ६०, ७०, ८० च्या दशकात वेगळ्या प्रकारचे गोलंदाज होते. तेव्हाच काय तर मी खेळत होतो तेव्हाचेही गोलंदाज वेगळे होते. त्यामुळे मला दोन खेळाडूंमध्ये तुलना आवडत नाही.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -