घरटेक-वेकई-मेल पाठवताय? सांभाळून...

ई-मेल पाठवताय? सांभाळून…

Subscribe

E-mail हा आपल्या व्यावसायिक आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. नोकरीचा अर्ज पाठवण्यापासून ते अन्य गोपनीय कामांसाठी ई-मेलचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे ऑफिशिअल पाठवतेवेळी काही गोष्टींचं भान ठेवणं खूप आवश्यक असतं.

Gmail च्या सेटिंग्जमध्ये थर्ड पार्टी डेव्हलपर्सना गुगलकडून आपले ई-मेल वाचण्याची परवानगी दिली जाते, असा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. त्यामुळे आपण पाठवत असलेले ई-मेल सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उभा राहिला. आता अशा प्रकरणात सुरक्षा बाळगणं आपल्या नियंत्रणात नाही. मात्र, कामाच्या संदर्भात एखाद्याला ई-मेल करतेवेळी काही महत्वाच्या गोष्टींची आपण नक्कीच काळजी घेऊ शकतो. आजकाल ऑफिशिअल कामांसाठी ई-मेलचा वापर खूप जास्त वाढला आहे. नोकरीसाठी अर्ज पाठवण्यापासून ते कंपनीच्या दृष्टीने गोपनीय असलेली माहिती पाठवण्यापर्यंत ई-मेलचा वापर केला जातो. त्यामुळे ई-मेल करताना तुमची प्रतिमा खराब होऊ नये किंवा तुमचे काम बिघडू नये, यासाठी काही गोष्टींचं भान राखायला हवं. ऑफिशिअल ई-मेल करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, याची माहिती खास तुमच्यासाठी.

कामाचे ई-मेल पाठवतेवेळी घ्या ही काळजी…

 

- Advertisement -
  • ऑफिशल मेल पाठवत असताना छोटी छोटी वाक्य लिहिणं टाळा. Sms ची भाषा, उदाहरणार्थ- Ok ऐवजी K, Take care ऐवजी TC किंवा Sorry ऐवजा Sry असे शब्द वापरु नका
  • कामासंबधीचा ई-मेल उगाचच नको त्या ठिकाणी बोल्ड लेटर्स वापरुन किंवा वेगवेगळ्या रंगांचा वापर करुन सजवू नका. आवश्यक तिथेच मोठ्या फाँटचा किंवा बोल्ड लेटर्सचा वापर करा
  • ई-मेलमध्ये भाषेची सरमिसळ करु नका. मेलच्या मजकूरामध्ये अर्धी इंग्लिश आणि अर्धी हिंदी (किंवा तुमची प्रादेशिक भाषा) अशी भाषा वापरणं टाळा
  • ई-मेलच्या Subject मध्ये मेलमधील मजकूर संक्षिप्त स्वरुपात समोरच्या समजेल, अशा अर्थाची एक ओळ लिहा. मुख्य मजकूरातील एखादं वाक्य copy-paste करुन subject मध्ये लिहू नका

या काही गोष्टींचं तुम्ही पालन केल्यास, तुमचा ऑफिशिअल Mail नेमका आणि सुटसुटीत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -