घरटेक-वेकसिस्का अक्सेसरीजचे एचएसबी 3000 साऊंड प्रो वायरलेस हेडसेट

सिस्का अक्सेसरीजचे एचएसबी 3000 साऊंड प्रो वायरलेस हेडसेट

Subscribe

भारताच्या मोबाइल अक्सेसरीज क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या सिस्का अक्सेसरीज कंपनीने सिस्का एचएसबी 3000 साऊंड प्रो वायरलेस हेडसेट लाँच केला आहे. साऊंड प्रो वायरलेस एचएसबी 3000 हेडसेट हे केवळ एक फॅशनेबल उपकरण नाही, तर तुमच्या संगीत श्रवणाच्या अनुभूतीला वेगळे परिमाण देणारे आहे. वायरलेस अक्सेसरीजची मागणी वाढत असताना सिस्काने आपल्या मोबाइल अक्सेसरीज विभागाअंतर्गत हे क्रांतीकारी उत्पादन लाँच केले आहे.

सिस्का साऊंड प्रो वायरलेस हेडसेट 40 एमएमच्या शक्तिशाली बास ड्रायव्हरसह येतो व त्यामुळे ऑडिओचा ध्वनी आणखी खोल होण्यास मदत होते. हेडसेटचे अडजस्ट करता येण्यासारखे इअरकप्स सहजपणे घडी घालता येतात. ते वजनाला हलके व सहज कुठेही नेता येण्यासारखे असल्यामुळे प्रवासात बरीच मदत होते. हा हेडसेट कमी वजनाच्या पॉलीमरपासून बनवण्यात आल्यामुळे तो पिसासारखा हलका झाला आहे. पर्यायाने तो बराच काळ परिधान करता येतो. हा हेडसेट टिकाऊ आणि भरपूर वापरानंतरही नव्यासारखा दिसणारा असल्यामुळे केवळ 2-3 तासांच्या चार्जवर 8-10 तास वापरता येऊ शकतो.

- Advertisement -

सिस्का साऊंड प्रो वायरलेस हेडसेटच्या लाँचविषयी सिस्का समूहाचे कार्यकारी संचालक गुरुमुख उत्तमचंदानी म्हणाले, की वायरलेस उपकरणांना असलेली मागणी वाढत असून वायरलेस हेडफोन्सची बाजारपेठ कित्येक पटींनी वाढेल असा अंदाज आहे. आजचे अत्याधुनिक तरुण ग्राहक सोयीस्करपणा आणि ट्रेंडीनेस या दोन्हीचे मिश्रण असलेल्या मोबाइल अक्सेसरीजना पसंती देतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -