Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर टेक-वेक Honor कंपनीचा भारतात पहिला ‘MagicBook 15’ लॅपटॉप झाला लाँच

Honor कंपनीचा भारतात पहिला ‘MagicBook 15’ लॅपटॉप झाला लाँच

Honor MagicBook 15 लॅपटॉप ई-कॉमर्स फ्लिपकार्ट वेबसाईटवर ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सेलसाठी उपलब्ध होणार आहे.

New Delhi
launch honor magicbook 15 laptop launched in india here is price sale and specifications details
Honor कंपनीचा भारतात पहिला 'MagicBook 15' लॅपटॉप झाला लाँच

MagicBook 15 हा भारतात लाँच होणार Honor कंपनीचा पहिला लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप AMD Ryzen 3000 सीरिज सीपीयूसोबत लाँच केला आहे. यामध्ये युजर्सना प्री-इंस्टॉल्ड विंडोज आणि स्लिम बेजेल्स सारखी सुविधा मिळले. खास फीचर्समध्ये 65W charge सपोर्ट दिला गेला आहे. याव्यतिरिक्त यामध्ये पॉप-अप वेबकॅम दिला आहे. युजर्स हा लॅपटॉप ई-कॉमर्स साइट Flipkartच्या माध्यमातून खरेदी करू शकतात आणि हा सिंगर कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

Honor MagicBook 15 किंमत आणि उपलब्धता

Honor MagicBook 15 भारतामध्ये ४२ हजार ९९० रुपये किंमतीसह लाँच केला आहे. हा लॅपटॉप मिस्टिक सिल्वर कलर व्हेरिएंटमध्ये ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सेलसाठी उपलब्ध होणार आहे. या सेलमध्ये रेगुलर ग्राहक देखील सहभागी होऊ शकतात. पण कंपनीने ५ ऑगस्टला निवड युजर्सना Flipkart early access सेलमध्ये हे डिव्हाइस खरेदी करता येईल. ५ ऑगस्टला हा सेल रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा लॅपटॉप फेब्रुवारीमध्ये लाँच झाला होता.

Honor MagicBook 15 चा स्पेसिफिकेशन्स

Honor MagicBook 15 मध्ये विंडोज १० प्री-इंस्टॉल्ड मिळले. यामध्ये १५.६ इंचचा फुल एचडी+आईपीस डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रिन रेजोल्यूशन 1,920×1,080 पिक्सल आहे. यामध्ये १७८ डिग्री व्यूइंग अँगल आणि ८७ टक्के स्क्रिन टू बॉडी रेश्यो आहे. हा डिव्हाइस AMD Ryzen 5 3500U प्रोसेसरवर काम करत आहे आणि यामध्ये Radeon Vega 8 ग्राफिक्सचा उपयोग केला गेला आहे.

या डिव्हाइसमध्ये 8GB DDR4 dual-channel रॅम दिला असून यामध्ये 256GB PCIe NVMe SSD आहे. यामध्ये 65W चार्जर दिला गेला आहे आणि टाईप सी पोर्टच्या मदतीने लॅपटॉप चार्ज केला जाऊ शकतो. या लॅपटॉपमध्ये युजर्सना टू इन वन फिंगरप्रिंट पॉवर बटन दिले गेले आहे. याच्या मदतीने हा डिव्हाइस सिक्योरली लॉगइन करू शकतो. यासह यामध्ये पॉप-अप वेबकॅमची सुविधा दिली गेली आहे. कनेक्टिविटीसाठी Honor MagicBook 15 मध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, एनएपसी, यूएसबी २.०, यूएसबी ३.०, एचडीएमआई पोर्ट, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स दिले गेले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here