निसानकडून डिझेल किक्सचे भारतात अनावरण

Mumbai
Nissan KICKS

निसानने भारतात त्यांच्या इंटलिजंट एसयूव्ही श्रेणीत संपूर्ण नव्या अशा किक्स एक्सई डिझेल आवृत्तीचे अनावरण केले. निसान किक्सची ही नवी एक्सई डिझेल आवृत्ती भारतभरात ९.८९ लाख रुपये अशा आकर्षक किमतीत उपलब्ध आहे.
उच्चतम श्रेणी, ऐसपैस अंतर्गत भाग आणि आकर्षक बाह्यरूप असे मिश्रण हवे असलेल्या ग्राहकांसाठी ही नवी श्रेणी एकमेवाद्वितीय असे मूल्य घेऊन आली आहे.

मागील बाजूस असलेल्या झोतासह (रिअर एसी व्हेंट) स्वयंचलित एसी, दोन एअरबॅग्ज, एबीएस + ईबीडी + ब्रेक असिस्ट, निसानकनेक्ट (गाडीशी संबंधित ५०हून अधिक तंत्रज्ञान वैशिष्ट्यांसह), यूएसबी आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटीसह २ डिन एसटीडी ऑडिओ, थंडावा असलेले ग्लोव्ह बॉक्स, शार्क फिन अँटेना, चाईल्ड लॉक सह सेंट्रल डोअर लॉक, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक आणि इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, रिअर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ड रिमाइंडर (डीआर) आदी ५०हून अधिक वैशिष्ट्यांमुळे किक्स एक्सई डिझेल आणि अन्य आवृत्त्या (किक्स एक्सएल डिझेल, किक्स एक्सव्ही डिझेल, किक्स एक्सव्ही प्रीमिअम डिझेल) एसयूव्ही श्रेणीतील अन्य आवृत्त्यांपेक्षा वरचढ ठरल्या आहेत.

गाडीच्या अनावरणप्रसंगी निसान मोटार इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष श्रीराम पद्मनाभन म्हणाले, एसयूव्हीची आवड असलेल्या गाडीप्रेमींकडून देशभरात नव्या निसान किक्सला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. डिझेल श्रेणीत प्रवेश पातळीवरील गाड्यांमध्ये ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर असलेला रस विचारात घेऊन आम्ही नवी एक्सई डिझेल ट्रिम ही आवृत्ती सादर केली आहे