घरटेक-वेकइन्स्टाग्राम खुलवणार तुमची प्रोफाईल, केला 'हा' बदल

इन्स्टाग्राम खुलवणार तुमची प्रोफाईल, केला ‘हा’ बदल

Subscribe

इन्स्टाग्राम ओपन केल्यानंतर तुम्हाला फोटो डाव्या बाजूला दिसायचा आणि त्याबाजूला तुमच्या पोस्टची संख्या, फॉलोअर्स आणि फॉलोव्हिंग दिसायचे. पण आता ...

सध्या सगळ्यात जास्त वापरलं जाणार सोशल प्लॅटफॉर्म म्हणजे इन्स्टाग्राम. इन्स्टावर अनेक अपडेटस येत असतात. म्हणजे एक साधारण महिनाभरापूर्वी IG TV इन्स्टावर सुरु झालं आणि आता तुमची प्रोफाईल अधिक खुलवण्यासाठी इन्स्टाग्रामने एक नवा बदल तुमच्या प्रोफाईलमध्ये केला आहे. तुम्ही जर ios वापरत असाल तर कदाचित तो बदल तुम्ही आधीच पाहिला असेल. आणि जर तुम्ही Android वापरत असाल तर तुम्हाला मात्र थोड वेळ थांबाव लागणार आहे कारण हा बदल अजून Android युजर्ससाठी आला नाही.

वाचा-इन्स्टाग्राम युजर्स आहात? मग वाचाच!!

काय केला बदल?

इन्स्टाग्राम ओपन केल्यानंतर तुम्हाला फोटो डाव्या बाजूला दिसायचा आणि त्याबाजूला तुमच्या पोस्टची संख्या, फॉलोअर्स आणि फॉलोव्हिंग दिसायचे. पण आता ios मध्ये इनस्टाग्राम प्रोफाईल फोटो उजव्या बाजूला गेला आहे. फॉलोअर्स आणि फॉलोव्हिंग खाली आले असून त्या खाली एडिट प्रोफाईलचा पर्याय आहे. त्यामुळे हा नवा लूक थोडासा वेगळा वाटत आहे.

- Advertisement -
वाचा- इन्स्टाग्राम अकाऊंट वेरीफाईड करायचंय; मिळवा ब्लू टिक

काहीच दिवसांपूर्वी आलं होत लाईट व्हर्जन

इन्स्टावर अॅक्टिव्ह असणाऱ्यांना या अॅपसाठी लागणारे फास्ट इंटरनेट सगळीचकडे असेल असे नाही. म्हणूनच लाईट र्व्हजन आणले. ज्याचा वापर अगदी 2G इंटरनेटवरही होतो. त्यासाठी तुम्हाला 4Gहवे असे नाही. या लाईट र्व्हजनला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. या शिवाय कमी इंटरनेटचा वापर केल्यामुळे तुमच्या फोनची स्पेस घेणारे हेवी र्व्हजन नवे घेणार नसल्यामुळे देखील अनेकांनी याला पसंती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -