घरटेक-वेकरोबोट चालणार 'पॉपकॉर्न'च्या उर्जेवर !

रोबोट चालणार ‘पॉपकॉर्न’च्या उर्जेवर !

Subscribe

पॉपकॉर्नच्या उर्जेवर चालणारा हा रोबोट 'नेचर फ्रेंडली' आहे, असा दावा त्याच्या निर्मात्यांनी केला आहे.

‘रोबोट’ला अनेकदा माणसांचा मित्र म्हटलं गेलं आहे. आजवर जगभरातील अनेक कंपन्यांनी विवध प्रकारची कामं करणारे रोबोट्स बनवले आहेत. तर दुसरीकडे अनेक कंपन्या भविष्यात माणसांची जागा घेऊ शकतील अशा अत्याधुनिक रोबोट्सची निर्मिती करत आहेत. मात्र, सध्या एक रोबोट एका वेगळ्याच कारणामुळे जगभरात गाजतो आहे. हा रोबोट चक्क पॉपकॉर्नच्या उर्जेवर चालणार आहे. चित्रपटगृहात चित्रपट पाहताना किंवा क्रिकेटची मॅच बघताना रंगत आणणारे पॉपकॉर्न उर्जा निर्मितीचंही काम करतात. याच उर्जेचा वापर करुन संशोधकांनी या नव्या रोबोटची निर्मिती केली आहे. मक्यांच्या दाण्यांना योग्य प्रमाणात उष्णता दिली की ते सुमारे आठ ते १० पटीने फुलतात/मोठे होतात. मक्याचे दाणे मोठे होऊन पॉपकॉर्न बनण्याच्या प्रक्रियेदरम्यान बऱ्याच प्रमाणात उर्जा निर्माण होते. संशोधकांनी बनवलेला हा रोबोट नेमक्या याच उर्जेवर चालणार आहे.

हेही वाचा : मलब्याखाली अडकलेल्यांना शोधणारा ‘अजब’ रोबोट


नेचर फ्रेंडली रोबोट

अमेरिकेतील कार्नेल युनिव्हर्सिटीच्या एच. पीटर्सन यांनी या अनोख्या रोबोटविषयीची माहिती एका मुलाखतीत दिली. पॉपकॉर्नच्या उर्जेवर चालणाऱ्या या रोबोटविषयी पीटर्सन सांगतात, ‘आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारचा एखादा रोबोट बनवण्याच्या प्रयत्नात होतो. आम्हाला एक असा रोबोट बनवायचा होता जो कमीत कमी खर्चाच बनून तयार होईल आणि वीजेचीही बचत करु शकेल. यातून आम्हाला पॉपकॉर्नच्या उर्जेवर चालणारा हा आगळा-वेगळा रोबो बनवण्याची कल्पना सुचली.’ याविषयी अधिक माहिती देताना पीटर्सन म्हणाले, ‘हा रोबोट नेचर फ्रेंडली असेल. रोबोला उर्जा देण्यासाठी लागणारे मक्याचे दाणे निसर्गासाठी हानिकारक नाहीत. मक्याचे दाणे सहज कुठेही उपलब्ध होतात आणि नैसिर्गिकरित्या त्याची विल्हेवाटही लावता येऊ शकते. त्यामुळे हा रोबोट निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी पोहचवणार नाही’.

- Advertisement -
हेही वाचा : ‘रश्मी’ रोबोट साधणार तुमच्याशी संवाद

दरम्यान उपलब्ध माहितीनुसार या रोबोटच्या निर्मितीचा अंतिम टप्पा नुकताच पार पडला असून, लवकरच त्याचं अधिकृत लाँचिंग केलं जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -