घरटेक-वेकवनप्लस ८ च्या विक्रीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या किमत

वनप्लस ८ च्या विक्रीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या किमत

Subscribe

वनप्लस ८ च्या विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. दुपारी १२ वाजल्यापासून विक्रिला सुरुवात झाली. अ‍ॅमेझॉन इंडिया आणि वनप्लसच्या वेबसाइटवर विक्री सुरु आहे. वनप्लस ८ प्रो सोबत हा फोन २९ मेपासून ओपन सेलमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार होता. मात्र, उत्पादनावर परिणाम झाल्याने पुढे ढकलण्यात आलं.

वनप्लस ८ च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपये आहे आणि 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. ग्राहकांसाठी हा फोन ग्लेशियल ग्रीन, ओनिक्स ब्लॅक आणि इंटरस्टेलर ग्लो कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. दुपारी १२ वाजल्यापासून अॅमेझॉन आणि वनप्लस वेबसाइटद्वारे विक्रीला सुरुवात झाली.

- Advertisement -

दोन्ही प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना ऑफरदेखील आहेत. अॅमेझॉन आणि वनप्लस या दोन्ही वेबसाइट्सवर एसबीआय कार्डवर २,००० रुपयांची सूट मिळत आहे. ईएमआय व्यवहारांवरही ही ऑफर देण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांनी प्रीबुकिंग केलं त्यांना अॅमेझॉन पेद्वारे एक हजार रुपयांची अतिरिक्त रोख परतावा देखील देण्यात येत आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना १२ महिन्यांसाठी विना-किंमत ईएमआयचा लाभ देखील मिळत आहे.


हेही वाचा – भारतीयांच्या आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्टच्या स्कॅन कॉपीची इंटरनेटवर विक्री

- Advertisement -

वनप्लस ८ च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना, ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 10 OxygenOS वर चालतो आणि 90Hz रीफ्रेश रेटसह ६.५५ इंचाचा फुल-एचडीप्लस (1,080×2,400 पिक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅमसह स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 48MPचा आहे. 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -