घरटेक-वेकट्विटरचे सीईओ जॅक डोर्सींनी घेतली राहुल गांधीची भेट

ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सींनी घेतली राहुल गांधीची भेट

Subscribe

फेक न्युजशी दोन हात करण्यासाठी ट्विटरने काही उपाययोजना केल्या आहेत, त्याची माहिती देण्यासाठी ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

ट्विटर सीईओ जॅक डोर्सी यांनी आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ट्विटर या सोशल नेटवर्कींग प्लॅटफॉर्मवर फेक न्युज पसरवण्यापासवून थांबवणे आणि विधायक सुसंवाद घडवण्यासाठी या भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. जागतिक स्तरावर ट्विटर हे संवादाचे सर्वात प्रभावी ऑनलाईन माध्यम ठरत आहे. जॅक यांनी सांगितले की, “आम्ही काही पावले उचलत आहोत जेणेककरुन ट्विटरवरील हा संवाद असाच चालू राहिला पाहिजे. तसेच खोट्या बातम्यांविरोधात लढा देण्यासाही देखील आम्ही उपाययोजना आखल आहोत.”

ट्विटर या सोशल नेटवर्कींग साईटवर जगभरात सध्या ३३६ दशलक्ष युजर्स असून ते वाढतच आहेत. पारदर्शकता, संवाद साधण्याच्या सभ्यतेमुळे ट्विटर प्लॅटफॉर्म ओळखला जातो. जॅक डोर्सी यांनी भारताला पहिल्यांदाच अचानक भेट दिलेली आहे. मागच्याच आठवड्यात त्यांनी दलाई लामा यांची भेट घेतली होती. त्यांच्यापासून डोर्सी इतके प्रभावित झाले की, लामा यांना विस्मयकारक शिक्षक अशी उपाधीच डोर्सी यांनी दिली.

- Advertisement -
हे माहितीये का – राहुल गांधींना मिळताहेत सर्वाधिक Likes

दलाई लामा यांच्या भेटीनंतर डोर्सी यांनी एक मजेशीर ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले की, “तुम्ही माझ्या नाकातील नथनी खरंच खेचली नाही, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, कारण ते माझ्यासाठी फारच वेदनादायी झाले असते.”

पुढच्या काही दिवसांत डोर्सी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांचीही भेट घेणार असल्याचे कळते. भारतात सध्या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर खोट्या बातम्या पसरल्याबद्दल सरकारने टीका केली होती. सरकारची ही नाराजी कमी करण्याचा प्रयत्न ट्विटरचे सीईओ डोर्सी या भेटीदरम्यान करतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -