घरदेश-विदेशगोव्यात गोमांस बंदी केली तर पर्रिकरांची प्रकृती सुधारेल

गोव्यात गोमांस बंदी केली तर पर्रिकरांची प्रकृती सुधारेल

Subscribe

चक्रपाणी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता चर्चा सुरु झाली आहे. गोव्यात जर गोमांसबंदी लागू झाली तर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीत सुधारणा होईल, असे मत चक्रपाणी महाराज यांनी व्यक्त केले आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर गेल्या नऊ महिन्यापासून उपचार सुरु आहेत. स्वादुपिंडाच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या मनोहर पर्रिकरांवर मुंबई, अमेरिका, दिल्ली त्यानंतर आता गोव्यामध्ये उपचार सुरु आहेत. दिल्लीतच्या एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मनोहर पर्रिकरांवर त्यांच्या गोव्यातील निवासस्थानी उपचार सुरु आहेत. पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या स्वामी चक्रपाणी महाराज यांनी एक अजब सल्ला दिला आहे. पर्रिकरांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी गोव्यात ताबडतोब गोमांसबंदी करा, असा सल्ला चक्रपाणी महाराज यांनी दिला आहे.

गोमांस बंदी लागू करा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती गेल्या अनेक महिन्यापासून खराब असल्यामुळे तसंच त्याच्यावर उपचार सुरु असल्यामुळे गोव्यामध्ये नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहे. तसंच गोव्यात नेतृत्व बदल झाला पाहिजे असे मत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईल यांनी व्यक्त केले आहे. त्यानंतर चक्रपाणी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता चर्चा सुरु झाली आहे. गोव्यात जर गोमांसबंदी लागू झाली तर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीत सुधारणा होईल, असे मत चक्रपाणी महाराज यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

रविवारी नियमित तपासणी झाली

गेल्या ९ महिन्यापासून कॅन्सरने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची रविवारी रुटीन चेकअप करण्यात आली. गोवा मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, मनोहर पर्रिकर यांची गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नियमित तपासणी करण्यात आली आहे. ६२ वर्षिय मनोहर पर्रिकर गेल्या ९ महिन्यापासून कॅन्सरचा सामना करत आहेत. ऑक्टोबरमध्ये गोव्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी पर्रिकर कॅन्सरने पीडित असल्याचे सांगितले होते.

६ महिने मासे आयातीवर बंदी

गोव्यामध्ये मासे खाण्यापासून वाढ असलेल्या धोक्याला लक्षात घेता गोवा सरकारने मासे आयातीवर सहा महिने बंदी घातली आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर भागामध्ये मासे सुरक्षित ठेवण्यासाठी फॉर्मेलिनचा वापर केला जातो. फॉर्मोलिन केमिकलमुळे कॅन्सरसारखा जीवघेणा आजार पसरण्याची शक्यता असते. शनिवारी गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी बंदीची घोषणा केली. राणे यांनी सांगितले की, जोपर्यंत माशांची तपासणी होत आहे. अशामध्ये पुढच्या सहा महिन्यासाठी गोव्यामध्ये माशांची आयात बंद राहिल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -