घरठाणेकल्याणमध्ये वीजचोरीला मदत करणाऱ्यास रंगेहाथ पकडले; आरोपी अटकेत

कल्याणमध्ये वीजचोरीला मदत करणाऱ्यास रंगेहाथ पकडले; आरोपी अटकेत

Subscribe

कल्याण पश्चिम उपविभागाची सतर्कता

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात वीजचोरीला मदत करणाऱ्यास महावितरणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यासंदर्भात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अटकेतील आरोपीकडे पोलीस अधिक तपास करत आहेत. इम्राम शेंदू शेख असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. कल्याण पश्चिम उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रमणी मेश्राम व त्यांचे पथक खडकपाडा भागातील चौधरी मोहल्ला येथे मीटर तपासणी करत असताना आरोपी शेख हा वीज मीटरशी छेडछाड करत असल्याचे आढळून आले.

आरोपी शेख हा वीज ग्राहक अल्ताफ उस्मान बंगाली यांच्या घरगुती वीज मीटरमध्ये वीज वापराची नोंद होऊ नये, अशा प्रकारे वायरिंग करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. मोहल्ल्यातील इतर मीटरची तपासणी केली असता बहुतांश मीटरच्या इनकमिंग आणि आउटगोइंगच्या वायरिंगला वीजचोरीच्या उद्देशाने छेडछाड केल्याचे उघड झाले. पथकाने त्याच्याकडून पक्कड, स्क्रू-ड्रायव्हर व टेस्टर ताब्यात घेतले व वीज कायदा कलम १५० अन्वये पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी वीजचोरीला मदत केल्याचा गुन्हा दाखल करून आरोपी शेख याला अटक केली. वीजचोरी हा अजामीनपात्र व गंभीर गुन्हा असून या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे विजेचा चोरटा व अनधिकृत वापर टाळण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता सुनील काकडे, कार्यकारी अभियंता दिगंबर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता मेश्राम, सहायक अभियंता वैभव कांबळे, दीपाली जावळे, कनिष्ठ अभियंता ज्ञानेश्वर शिंदे, कर्मचारी अशोक वारके, शेषपाल चव्हाण, रमेश शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


हेही वाचा – ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात भीषण आग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -