घरट्रेंडिंगभंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटला, नगरच्या घटनेत एकाचा मृत्यू

भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटला, नगरच्या घटनेत एकाचा मृत्यू

Subscribe

के.के. रेंज हद्दीत लष्कराचा दारूगोळा उडवण्याचा सराव चालतो. या सरावानंतर फुटलेले बॉम्ब, गोळ्यांची आवरणे, निकामी शस्त्र किंवा तत्सम भंगार गोळा करण्यासाठी परिसरातील नागरिक या लष्कराच्या हद्दीत घुसतात. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचं बोललं जातंय.

अहमदनगरमध्ये लष्कराच्या हद्दीत भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटल्याची घटना घडली असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. भिवा साधू गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव असून लष्कराच्या के के रेंज हद्दीतून आलेला बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट होऊन ही दुर्घटना झाली. अहमदनगर तालुक्यातील खारेकर्जुने या ठिकाणी ही घटना घडली आहे.

नजर चुकवून भंगार गोळा करणं पडलं महागात –

के.के. रेंज हद्दीत लष्कराचा दारूगोळा उडवण्याचा सराव चालतो. के के रेंज परिसर हा लष्कराचा संवेदनशील भाग आहे. इथे जवानांचा युद्धाचा सराव चालतो. मोठमोठे रणगाडे, तोफा, बॉम्बस्फोटांचा मारा केला जातो. या सरावानंतर फुटलेले बॉम्ब, गोळ्यांची आवरणे, निकामी शस्त्र किंवा तत्सम भंगार गोळा करण्यासाठी परिसरातील नागरिक या लष्कराच्या हद्दीत घुसतात. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचं बोललं जातंय. शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी दोघे जखमी झाले आहेत. यापुर्वी देखील अशाच पद्धतीने भंगार गोळा करताना त्याच्या झालेल्या स्फोटात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देखील सकाळीच काही लोक निकामी झालेल्या बॉम्बचे भंगार गोळा करण्यासाठी या परिसरात गेले होते. तेथे त्यांना जीवंत बॉम्ब आढळला. त्यांनी हा बॉम्ब माळरानावर फोडण्याचा प्रयत्न केला, त्याचा स्फोट झाल्याने घटनास्थळीच गायकवाड याचा मृत्यू झाला. तर जखमींची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील, एमआयडीसीचे सहाय्यक निरीक्षक मोहन बोरसे यांनी भेट दिली.

- Advertisement -

यापूर्वीच्या स्फोटात दोघांचा मृत्यू

यापूर्वी जुलै २०१९ मध्येही असाच स्फोट होऊन खारेकर्जुने याच गावातील दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. अहमदनगरमधील लष्कराच्या के के रेंज हद्दीमध्ये स्फोट होऊन दोघांचा मृत्यू झाला होता. अक्षय नवनाथ गायकवाड वय १९ आणि संदीप भाऊसाहेब तिरवडे वय ३२ अशी मृतांची नावे होती. भंगार गोळा करताना जिवंत बॉम्ब फुटल्याने हा स्फोट झाला होता. दोघेही मृत खारेकर्जुने गावचे रहिवासी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -