जिजाऊंच्या पोटी जन्मणार स्वराज्याचा सिंह

शिवजयंती दिवशी मालिकेत शिवजन्म सोहळा पाहण्याचा अभूतपूर्व अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराज या नावाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. सह्याद्रीच्या या सिंहाने अवघ्या महाराष्टाचे भवितव्य घडवले पण या सिंहाला घडवले हे त्याच्या मातेने म्हणजे जिजाऊ माँ साहेबांनी. ज्या मातेने मराठी मुलुखाचे भविष्य घडवले त्या मातेची कहाणी सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. आता मालिकेत येत्या काही भागांमध्ये शिवजन्म होणार आहे. सह्याद्रीचा सिंह, रयतेचा कैवारी आणि जिजाऊंचे स्वराज्याचे स्वप्न साकारणारा पुत्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज मालिकेत जिजाऊंच्या पोटी जन्माला येणार आहेत.

आजपर्यंत जिजाबाईंनी आपल्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी खूप किंमत मोजली. परकीयांकडून वेळोवेळी त्यांच्या आप्तइष्टांवर हल्ले झाले त्यात त्यांना आपली जवळची माणसे गमवावी लागली. पण स्वराज्य साकाराव, परकीयांची गुलामी करू नये, आपल्याच माणसांनी एकमेकांमध्ये भांडून बळी पडू नये, याबद्दल त्यांची मतं ठाम असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात स्त्रियांना किती मानाने वागवले जायचे आणि स्त्रियांशी गैर वर्तन करणाऱ्यांची काय गत व्हायची याच्या कथा आजही प्रसिद्ध आहेत. पण, नुकत्याच मालिकेत घडलेल्या इकलाखच्या गर्दन मारण्याच्या प्रसंगातून हे जाणवते की हे संस्कार जिजाऊंनी शिवरायांवर केलेले आहेत. जिजाऊंचे हे संस्कारच होते ज्यांनी महाराष्ट्रालाच नव्हते तर संपूर्ण जगाला जाणता राजा मिळाला. त्याप्रमाणेच शिवजयंती दिवशी मालिकेत देखील शिवजन्म सोहळा पाहण्याचा अभूतपूर्व अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.


हेही वाचा – आता हिंदीतही येणार ‘रात्रीस खेळ चाले’