Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर ट्रेंडिंग Accident Video: विचित्र अपघात; तो हवेत उडाला आणि थोडक्यात वाचला

Accident Video: विचित्र अपघात; तो हवेत उडाला आणि थोडक्यात वाचला

Bengaluru
man flung into air by hanging wire
विचित्र अपघात

बंगळुरुमध्ये एक विचित्र अपघात घडला असून सीसीटीव्हीमुळे या अपघाताची दाहकता आपल्याला कळू शकतेय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे. हा अपघात झालाच कसा? हे पाहण्यासाठी अनेक लोक हा व्हिडिओ वारंवार पाहत आहेत. या व्हिडिओमध्ये अचानक हवेत उडालेला दिसतोय. थोड्या अंतरावर एक महिला जात आहे. तिच्या अंगावर पडल्यामुळे हवेत उडालेला हा व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. मात्र या विचित्र अपघातात त्या महिलेला ५२ टाके पडले आहेत.

बंगळुरूमधील कोलार येथील टीसी पायला रोड येथे ही विचित्र घटना घढली. रस्त्यामध्ये एका रिक्षाच्या चाकाखाली रस्त्यावर जाणारी वायर अडकली होती. रिक्षाचालक ही वायर काढत असताना बाजूनेच जाणारी एक भरधाव गाडी ही वायर जोरात खेचते. त्याचवेळी त्या वायरवर उभा असलेला हा रिक्षाचालक हवेत फेकला जातो. काही क्षणातच या रस्त्यावरुन जाणाऱ्या के. सुनीत यांच्या अंगावर तो आदळतो. १६ जुलै रोजी सकाळी ११.३४ मिनिटांनी हा आपघात घडलेला आहे.

 

४२ वर्षीय के. सुनिता या आपल्या पतीला भेटण्यासाठी जात होत्या. जो तेथून जवळच काम करतो. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पतीने सुनिता यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यावेळी रिक्षाचालक देखील किरकोळ जखमी झालेला आहे. मात्र सुदैवाने दोघेही या अपघातातून बचावले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here