Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग मुलगी झाली विरूष्काला पण तैमूरचीच होतेय चर्चा; मीम्स व्हायरल

मुलगी झाली विरूष्काला पण तैमूरचीच होतेय चर्चा; मीम्स व्हायरल

सोशल मीडियावर पुन्हा एकदा तैमूरशी संबंधित मीम्सचा वर्षाव

Related Story

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांनी ११ जानेवारी रोजी गोड मुलीला जन्म दिला. विराट कोहलीने सोशल मीडियावर आपल्या घरी लहानग्या चिमुकलीचे आगमन झाले असल्याची आनंदाची बातमी शेअर केली. मात्र या दरम्यान करीना आणि सैफ अली खानचा तैमूर अली खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा तैमूरशी संबंधित मीम्सचा वर्षाव होत आहे. सध्या तैमूर साधारण ४ वर्षाचा झाला असून तो त्याच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. तो कुठेही घराबाहेर पडला की त्याच्यामागे फोटोग्राफर्स. बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध स्टारकिड म्हणून तैमूरची ओळख आहे. मात्र आता विराट-अनुष्काच्या मुलीच्या आगमनाने बॉलिवूडमधील स्टारकिडच्या यादीत भर पडली आहे. त्यामुळे आता तैमूर नाही तर विरूष्काच्या मुलीची जास्त चर्चा होईल अशाच आशयाच्या मीम्सने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

दरम्यान, आता तैमूर नाही तर विरूष्काच्या मुलीची अधिक चर्चा होईल, असे म्हणत नेटक-यांनी जोरदार मीम्स शेअर केलेत. फिर अपना काम खल्लास, तेरा काम हो गया तू जा, अब अंडरग्राऊंड होने का समय आ गया है… असे भन्नाट कॅप्शन लिहित नेटक-यांनी विनोदी मीम्सचा वर्षाव केल्याचे दिसतेय.

बघा व्हायरल होणारे मीम्स

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisement -