घरट्रेंडिंगचेतन भगत आता 'व्यक्त' होणार नाही..

चेतन भगत आता ‘व्यक्त’ होणार नाही..

Subscribe

लेखक चेतन भगत सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवरील आपली मतं मांडत असतो. मात्र त्याच्या ट्विट्सना लोकांकडून ट्रोल देखील केले जाते. सततच्या ट्रोलिंगला कंटाळल्याने चेतन भगतने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे सोशल मीडियावर व्यक्त होणार नसल्याचे चेतनने सांगितले आहे.

सोशल मीडियावर राहणार अलिप्त

ट्विटरवर होणाऱ्या ससतच्या ट्रोलिंगला कंटाळून चेतन भगतने सोशल मीडियापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्याने ‘नो मोअर एक्स्प्लेनेशन’ अर्थात कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण न देण्याचे धोरण स्विकारले आहे. गुरुवारी चेतन भगतने फेसबुकवर यासंबंधीची सविस्तर नोट प्रसिद्ध केली.

- Advertisement -
स्पष्टीकरण न देण्याबाबत ‘स्पष्टीकरण’

चेतन भगतने स्विकारलेल्या या नव्या धोरणाविषयी तो म्हणतो की, ”सोशल मीडियावर कोणत्याही स्पष्टीकरण न देण्याचा माझा निर्णय उर्मट वाटू शकतो. लोक मी केलेल्या विविध वक्तव्यांवरच स्पष्टीकरण मागत असतात. मात्र, तरीही यापुढे मी ट्वीटरवर कोणालाच कसलेच स्पष्टीकरण देणार नाही.”

याबाबत अधिक खुलासा करताना तो म्हणतो, ”मी सोशल मीडियावरुन कधीच कुठल्या राजकीय पक्षाचे ना समर्थन केले ना विरोध दर्शविला. मी कुठल्याही विषयावरचे मत हे त्यावर पूर्णपणे विचार करुन मांडतो. तुम्हाला मी मूर्ख वाटत असेन तर तुम्ही हुशार बना. मी माझं मत प्रांजळपणे मांडतो. मात्र, त्याबदल्यात मला बहुतांशी लोकांकडून कायमच अपमान आणि ट्रोलिंग सहन करावे लागले आहे. माझ्या मतांना उर्मट ठरवत त्याचा अनादर करण्यात आला आहे. बहुतांशी सेलिब्रेटी आणि राजकारण्यांनी माझ्या मतांना ट्रोल केलं नसल्याचं पाहून समाधान वाटते.”

- Advertisement -

 

यासंदर्भातली विस्तृत नोट त्याने फेसबुकसोबतच ट्वीटरवरही (ट्विटरवरही) पोस्ट केली आहे. यावर त्याच्या चाहत्यांच्या आणि अन्य लोकांच्या संमीश्र प्रतिक्रीया पाहायला मिळत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कर्नाटक निवडणूकांच्यावेळी (निवडणुकांच्यावेळी) चेतन भगतने केलेल्या एका ट्वीटरुन (ट्विटवरुन) तो खूप ट्रोल झाला होता. चेतन भगत भाजप आणि मोदी भक्त असल्याचे म्हणत, नेटिझन्सनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -