घरट्रेंडिंगValentines Day : व्हॅलेंटाईन्स डे अविस्मरणीय बनवण्यासाठी करा या १० गोष्टी

Valentines Day : व्हॅलेंटाईन्स डे अविस्मरणीय बनवण्यासाठी करा या १० गोष्टी

Subscribe

नेहमी पेक्षा काहीतरी वेगळ करुण आपला व्हॅलेंटाईन्सडे साजरा करणाऱ्यांनी हे नक्की वाचा.

१४ फेब्रुवारी हा दिवस संपुर्ण जगभरात प्रेम करण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन्सडे म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिवशी साधारण प्रेमी युगुल सिनेमा पाहायला जातात, डिनर किंवा लंचचा प्लॅन करतात, एकमेकांना भेटवस्तू देतात. मात्र तुम्हाला यापेक्षा जर हटके आणि अविस्मरणीय असा व्हॅलेंटाईन्सडे  साजरा करायचा असेल तर या १० गोष्टी नक्की करा.

१४ फेब्रुवारीला आपल्या व्हॅलेंटाईन सोबत एका लॉंगड्राइवर जा, निसर्गाच्या सानीध्यात आपल्या प्रियव्यक्ती सोबत सुंदर आठवणी बनवा.

- Advertisement -

आशा सुंदर ठिकाणी एकमेकांच्या सहकार्याने जर काही मस्त चमचमीत जेवण बनवल तर नक्कीचते संस्मरणीय होइल. तो पदार्थ आयुष्यभरासाठी आठवणीत राहील हे नक्की.

पहिला व्हॅलेंटाईन्सडे  साजरा करण्यासाठी मुंबई पासुन जवळ असलेले माथेरान,अलीबाग, लोणवळा हे उत्तम लॉंगड्राइव पर्याय आहेत. ही ठिकाण तुमचा पहिला व्हॅलेंटाईन्सडे  नक्की संस्मरणीय करतील.

- Advertisement -

जर तुम्ही बिनधास्त असाल आणि तुम्हाला टॅटु काढायला आवडत असेल तर दोघांनीही आपापल्या हातावर एकसारखा टॅटु काढुण पहिला व्हॅलेंटाईन्सडे स्पेशल करता येईल.

आजकाल वाढदिवस ज्या प्रमाणे गरीब आणि अनाथ मुलांसोबत साजरा केला जातो त्याच प्रमाणे तुमचा व्हॅलेंटाईन्सडे चा दिवस या मुलांसोबत साजरा केलात तर या पेक्षा सुंदर काही असुच शकत नाही.

एक मेकांना काही प्रॉमीसेस करूण, काही अता पर्यंत सांगितल्या नाही अशा गोष्टी शेअर करूण हा दिवस स्पेशल करता येऊ शकतो.

आजच्या तरूणाईला आकर्षीत करणाऱ्या पब, डिस्को अशा ठिकाणी व्हॅलेंटाईन्सडे च्या दिवशी अनेक ऑफर्स असतात. तेव्हा या ठिकाणी जाउन तुम्ही तुमची व्हेलेंनटाइन नाइट मजेदार बनवु शकता.

मित्र-मैत्रीणींच्या सहभागा शिवाय कोणतीही पार्टी मजेदार होत नाही, तेंव्हा आपल्या मित्रांसोबत पार्टीची तयारी करा.

कोणतेही सेलिब्रेशन केक शिवाय अर्धवट वाटते, तेंव्हा आपल्या व्हॅलेंटाईन्स साठी आपल्या हाताने बनवलेला केक भरवण्याची मजा काही वेगळीच असेल.

तुम्ही जर लवकरच लग्न करणार असाल, तर कोणताही मुहुर्त न बघता या दिवशी तुम्ही लग्न बंधनात अडकलात तर नक्कीच हा दिवस तुमच्या प्रेमाच रूपांतर एका सुंदर अशा नात्यात करण्याचा असा सुरेख दिवस ठरेल. कारण तुम्ही अयुश्य भरासाठी एकमेकांचे व्हॅलेंटाईन व्हाल .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -